ख्रिस्तियानो रोनाल्डो सर्वकालीन बॅलोन डी'ओर पुरस्काराचा मानकरी
नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर (हिं.स.)जगभरातील चाहत्यांच्या प्रचंड मतदानानंतर, पोर्तुगीज दिग्गज ख्रिस्तियानो रोनाल्डोला सर्वकालीन सर्वोत्तम बॅलन डी''ओर पुरस्काराचा पहिला मानकरी ठरवण्यात आले आहे. मँचेस्टर युनायटेडसोबतचा त्याचा २००८ चा हंगाम, फुटबॉलमधील या
क्रिस्टियानो रोनाल्डो


नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर (हिं.स.)जगभरातील चाहत्यांच्या प्रचंड मतदानानंतर, पोर्तुगीज दिग्गज ख्रिस्तियानो रोनाल्डोला सर्वकालीन सर्वोत्तम बॅलन डी'ओर पुरस्काराचा पहिला मानकरी ठरवण्यात आले आहे. मँचेस्टर युनायटेडसोबतचा त्याचा २००८ चा हंगाम, फुटबॉलमधील या अत्यंत प्रतिष्ठित वैयक्तिक पुरस्काराच्या इतिहासातील सर्वोत्तम वर्ष म्हणून ओळखला गेला आहे. 'फ्रान्स फुटबॉल' या संस्थेने हा एक अनोखा पुरस्कार सुरू केला आहे. फुटबॉलमधील श्रेष्ठतेबाबतच्या चर्चेत अधिक रंगत आली आहे. हॅरी केनने बॅलन डी'ओर जिंकल्यानंतर, ख्रिस्तियानोला 'BOAT' पुरस्कार देण्यात आला. कोणत्या हंगामातील बॅलन डी'ओर विजय इतर सर्वांपेक्षा सरस आहे, हे ठरवण्यासाठी हा पुरस्कार सुरू करण्यात आला होता.

ख्रिस्तियानोने त्याचा दीर्घकालीन प्रतिस्पर्धी लिओनेल मेस्सीला मागे टाकत हा पुरस्कार पटकावला. मतदारांनी मेस्सीच्या २०१२ मधील ९१ गोलच्या हंगामापेक्षा (जो विक्रम आजही कायम आहे) ख्रिस्तियानोच्या पहिल्या बॅलन डी'ओर विजयाला अधिक पसंती दिली.

पारंपारिक बॅलन डी'ओर पुरस्कारासाठी विजेत्याची निवड आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित पत्रकारांच्या पॅनेलद्वारे केली जाते, पण 'BOAT' पुरस्कारासाठी निर्णय घेण्याचे अधिकार चाहत्यांना देण्यात आले होते, ज्याद्वारे त्यांनी डिजिटल पद्धतीने मतदान केले. नामांकनांच्या यादीत अशा खेळाडूंचा समावेश होता ज्यांनी अनेकदा बॅलन डी'ओर जिंकला आहे. यामध्ये जोहान क्रुइफ, मिशेल प्लातिनी, मार्को व्हॅन बास्टन, कार्ल-हाइन्झ रुमेनिगे, केविन कीगन आणि फ्रांझ बेकेनबाउर यांच्यासह रिअल माद्रिदचा दिग्गज अल्फ्रेडो डी स्टेफानो आणि ब्राझीलचा महान खेळाडू रोनाल्डो नाझारिओ यांचा समावेश होता.

मतदान करण्यासाठी चाहत्यांना एक युरो शुल्क भरावे लागत होते. चाहत्यांचा सहभाग वाढवण्यासाठी, आयोजकांनी मतदान करणाऱ्या सर्वांसाठी एक 'प्राइझ ड्रॉ' (लकी ड्रॉ) ठेवला होता, ज्यामध्ये विजेत्याला २०२७ च्या बॅलन डी'ओर सोहळ्याची दोन तिकिटे मिळणार होती. हा निर्णय चाहत्यांच्या पसंतीस उतरला; हजारो चाहत्यांनी शुल्क भरून मतदान केले. ५,००० हून अधिक लोकांनी तर अनेकदा मतदान केले, जेणेकरून त्यांचा आवडता खेळाडू किंवा त्यांचा एखादा विशिष्ट हंगाम विजयी ठरावा. या यादीत रोनाल्डो आणि मेस्सीचे वर्चस्व दिसून आले, कारण पहिल्या १२ स्थानांवर हे दोघेच होते. १३ व्या क्रमांकावर, २००२ मध्ये ब्राझीलच्या रोनाल्डो नाझारिओने जिंकलेला 'बॅलन डी'ओर' पुरस्कार या मालिकेतील खंड ठरला.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande