नोव्हाक जोकोविचची बासेल ओपनमध्ये विजयी सलामी
बासेल, २९ ऑक्टोबर, (हिं.स.) - सर्बियन टेनिस स्टार नोव्हाक जोकोविचने बासेल ओपनमधील आपल्या पहिल्या सामन्यात फ्रान्सच्या युगो हम्बर्टला तीन सेट्समध्ये पराभूत करून एटीपी फायनल्ससाठी पात्र ठरण्याच्या आपल्या आशा कायम ठेवल्या आहेत. जोकोविचने पहिला सेट ग
नोव्हाक जोकोविच


बासेल, २९ ऑक्टोबर, (हिं.स.) - सर्बियन टेनिस स्टार नोव्हाक जोकोविचने बासेल ओपनमधील आपल्या पहिल्या सामन्यात फ्रान्सच्या युगो हम्बर्टला तीन सेट्समध्ये पराभूत करून एटीपी फायनल्ससाठी पात्र ठरण्याच्या आपल्या आशा कायम ठेवल्या आहेत. जोकोविचने पहिला सेट गमावल्यानंतर उल्लेखनीय पुनरागमन करत ४-६, ६-३, ६-४ असा विजय मिळवला. तो २०११ नंतर प्रथमच बासेलमध्ये खेळत आहे.

सामन्यानंतर जोकोविच म्हणाला, हा सामना खूप चुरशीचा आणि सुरुवातीपासूनच खूप आव्हानात्मक होता. पहिल्याच पॉईंटपासून माझ्यावर दडपण आले होते. मला त्याच्या आक्रमक खेळाचा सामना करावा लागला, पण दुसऱ्या सेटच्या सुरुवातीला मला माझा लय सापडला. तो म्हणाला, त्यानंतर, त्याच्या खेळाच्या गतीशी जुळवून घेणे मला थोडे अधिक सोयीचे वाटले. एकूणच, हे एक मोठे आव्हान होते. आजच्या कठीण सामन्यात मला एक तोडगा सापडला.

या महिन्याच्या सुरुवातीला बीजिंगमध्ये चायना ओपन जिंकून जोकोविचने विक्रमी १९व्यांदा एटीपी फायनल्ससाठी पात्र ठरण्याच्या आपल्या आशा बळकट केल्या. हे त्याच्या कारकिर्दीतील १०२वे विजेतेपद होते. मात्र, त्यानंतर त्याला शांघाय मास्टर्समधून लवकर बाहेर पडावे लागले. २४ ग्रँडस्लॅम विजेतेपदे जिंकलेल्या जोकोविचने, ट्यूरिनमधील हंगामाच्या अंतिम स्पर्धेसाठी पात्र ठरण्याच्या शर्यतीत ११व्या स्थानावर घसरल्यानंतर वाईल्ड कार्डद्वारे स्विस स्पर्धेत प्रवेश केला.

जोकोविचने सात वेळा एटीपी फायनल्स जिंकले आहे, पण दुखापतीमुळे तो मागील दोन स्पर्धांमध्ये खेळू शकला नाही. १५ ते २२ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत जगातील अव्वल आठ टेनिसपटूंमध्ये सहभागी होईल. मात्र, इटलीच्या यानिक सिनरने गुडघ्याच्या समस्येमुळे स्पर्धेतून आधीच माघार घेतली आहे.

बासेलमध्ये चौथे मानांकन मिळालेल्या जोकोविचचा सामना पुढील फेरीत जर्मनीच्या जॅन-लेनार्ड स्ट्रफशी होईल. स्ट्रफविरुद्ध जोकोविचचा ८-० असा विजय-पराजयचा विक्रम आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande