कुंभमेळ्याला पाणी सोडणार नाही - गिरीश महाजन
नाशिक, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। नाशिकमध्ये होत असलेल्या कुंभमेळ्याला गोदावरी नदीमध्ये पाणी सोडण्याचा विषय येत नाही कारण ज्या पद्धतीप्रमाणे रोटेशन आहे त्याच पद्धतीप्रमाणे पाणी दिलं जाईल कुंभमेळ्याला पाणी दिलं जाणार नाही असे स्पष्ट मत पालकमंत्री गिरीश म
Will not release water for Kumbh


नाशिक, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। नाशिकमध्ये होत असलेल्या कुंभमेळ्याला गोदावरी नदीमध्ये पाणी सोडण्याचा विषय येत नाही कारण ज्या पद्धतीप्रमाणे रोटेशन आहे त्याच पद्धतीप्रमाणे पाणी दिलं जाईल कुंभमेळ्याला पाणी दिलं जाणार नाही असे स्पष्ट मत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केल आहे.

शनिवारी होत असलेल्या ध्वजारोहणाच्या पार्श्वभूमीवरती कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयात निवडक पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या समावेत विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम महापालिका आयुक्त मनीषा खत्री, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी कुंभमेळ्याला पाणी सोडणार का या प्रश्नावर ती बोलताना कुंभमेळा मंत्री आणि राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की कुंभमेळ्याला पाणी सोडणार नाही दुष्काळी परिस्थिती आहे हे जरी मान्य केलं तरी देखील ज्यावेळी ऑगस्ट महिन्यामध्ये कुंभ आहे त्यावेळी गोदावरी नदीमध्ये पाणी हे असतं त्यावेळेस नाशिक शहरात आणि जिल्ह्यामध्ये पाऊस पडलेला असतो आणि पाऊस पडत असतो असे स्पष्ट करून ते पुढे म्हणाले की , 10 टक्के पाणी कपात करने आवश्यक असल्यामुळे सर्व जी पावलं उचलली जात आहे असे देखील यावेळी त्यांनी सांगितले.

या सर्व प्रश्नावरती बोलताना राज्याचे जलसंपदा मंत्री आणि कुंभमेळा मंत्री महाजन पुढे म्हणाले की यावेळी बाप्षी भवन हे जास्त होणार आहे. याची चिंता प्रशासनाला आहे त्यामुळे पाणी कपातीचा निर्णय हा प्रशासनाने आतापासूनच घेतला आहे असे स्पष्ट करून ते म्हणाले की या सर्व प्रश्नांवरती प्रशासन गंभीर आहे त्यामुळे कुंभमेळायला पाणी सोडलं जाणार नाही जे रोटेशन आहे तेच रोटेशन दिलं जाईल असे ते म्हणाले

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande