निवृत्तीनाथ महाराज संस्थानच्या अध्यक्षावर लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल
नाशिक, 03 ऑक्टोबर (हिं.स.)। - त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानचे अध्यक्ष राहुल साळुंखे याच्या अडचणीत वाढ झाली आहे. लैंगिक शोषण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्न करतो असे आमिष दाखवून गेल्या तीन वर
निवृत्तीनाथ महाराज संस्थानच्या अध्यक्षावर लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल


नाशिक, 03 ऑक्टोबर (हिं.स.)।

- त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानचे अध्यक्ष राहुल साळुंखे याच्या अडचणीत वाढ झाली आहे. लैंगिक शोषण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्न करतो असे आमिष दाखवून गेल्या तीन वर्षांपासून ओळख असलेल्या २९ वर्षीय महिलेचे लैंगिक शोषण केल्याचे तिने दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

बारामती तालुक्यात राहणाऱ्या पीडितेच्या भावाने २४ सप्टेंबर रोजी इंदिरानगर पोलीस ठाण्यात त्याच्या २९ वर्षीय बहिणीसह सहा वर्षांच्या भाचीचे अपहरण केल्याची फिर्याद नोंदवली होती. या तक्रारीवरून सुरुवातीला संशयित राहुल साळुंखे आणि बाकेराव ढेमसे यांच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, पीडित महिला आपल्या काकाकडे आली होती. ते तिला घेऊन पोलीस ठाण्यात गेले.

तेथे दिलेल्या जबाबत तिने म्हटले आहे की ती आणि साळुंखे हे गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. तो तेव्हा पासून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवायचा. पीडित महिलेने इंदिरानगर पोलिसांकडे नोंदवलेल्या नव्या जबाबानंतर या गुन्ह्यात शारिरीक शोषण, लग्नाचे खोटे आमिष अशी अतिरिक्त कलमे वाढवण्यात आली आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande