
- कर्नलसिंग राहल, राजेश गुप्ता आणि मनोज साबू यांचा समावेश
अमरावती, 03 ऑक्टोबर (हिं.स.)।
'कोणार्क इन्फ्रास्ट्रक्कर लिमिटेड' कंपनीची तब्बल २ कोटी ७५ लाख ८० हजार ३०० रुपयांची आर्थिक फसवणूक तसेच कंपनीच्या ताब्यातील सर्व ७६ वाहने परस्पर ताब्यात घेण्याचे प्रकरण आता गंभीर वळणावर पोहोचले आहे. या प्रकरणी कचरा व्यवस्थापन व वाहतुकीचे कंत्राट मिळविणाऱ्या 'कोणार्क इन्फ्रास्ट्रक्च र लिमिटेड' या कंपनी स्थानिक व्यवस्थापक आदित्य सुरवाडे यांनी तक्रार नोंदविली होती. अखेर या तक्रारीच्या आधारे सिटी कोतवाली पोलिसांनी २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी आरोपी कर्नलसिंग राहल, राजेश गुप्ता आणि मनोज रामरतन साबू (सर्व रा. अमरावती) या तिघांविरुद्ध फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल केला आहे.
कचरा आवश्यक तक्रारीनुसार, शहरातील व्यवस्थापनाकरिता वाहने खरेदी करण्यासाठी कर्नलसिग राहल यांनी कोणार्क कंपनीकडे मध्यस्थी केली. त्यानुसार कोणार्कनग श्री नागरिक सेवा सहकारी संस्था' व 'तुळजाई ट्रान्सपोर्ट' यांच्याशी बोलणी करून एकूण ७६ वाहनांच्या विक्रीचा तोंडी करार केला होता. या व्यवहारापोटी कोणार्क कंपनीने तुळजाई ट्रान्सपोर्टला १६ वाहनांच्या बदल्यात ५३ लाख ८० हजार ३०० रुपये आणि श्री नागरिक सेवा सहकारी संस्थेला ६० वाहनांच्या बदल्यात २ कोटी २२ लाख रुपये असे एकूण पावणेतीन कोटी रुपये टप्प्याटप्प्याने ऑनलाईन व चेकमार्फत दिले होते. तसेच ६० पैकी ४७ वाहनांचे टॅक्स इन्व्हाईसदेखील कंपनीने घेतले होते. मात्र, १९ सप्टेंबर रोजी व्यवहारावरून वाद झाल्यानंतर तिन्ही आरोपींनी कोणार्क कंपनीला कोणतीही पूर्वसूचना न देता कंपनीच्या ताब्यातील सर्व ७६ वाहने परस्पर ताब्यात घेऊन तेथून निघून गेले. कंपनीने वारंवार करारनाम्याबाबत व वाहनांबाबत विचारणा केली असता आरोपींनी टाळाटाळ केली. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
२.७५ कोटींच्या नुकसानीचे आरोप
तक्रारीनुसार, ७६ वाहनांच्या प्रकरणामुळे कंपनीला एकूण २.७५ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. कंपनीने या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली आणि याच्या आधारे, शहर कोतवाली पोलिसांनीआरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांच्या नोंदीनुसार, आरोपींची नावेकर्नल सिंग राहल, राजेश गुप्ता आणि मनोज रामरतन साबू अशी आहेत.सर्व कागदपत्रे, वाहन खरेदी करार, पेमेंटची कागदपत्रे आणि वाहनांच्या सध्याच्या नोंदी तपासल्या जात आहेत. शहर कोतवाली पोलीस आपला तपास सुरू ठेवत आहेत. ७६ वाहनांची खरेदी, पेमेंट, मालकी, नोंदी आणि संबंधित करारांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींची भूमिका आणि कंपनीला झालेल्या प्रत्यक्ष आर्थिक नुकसानीचाही पोलीस तपास करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी