
सोलापूर, 03 ऑक्टोबर (हिं.स.)।
शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि आधुनिक करण्याच्या दृष्टीने प्रस्तावित ई-बस सेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. ई-बस डेपोची उर्वरित कामे, चार्जिंग स्टेशन, आवश्यक वीजपुरवठा तसेच अन्य पायाभूत सुविधांची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना महापौर विनायक कोंड्याल यांनी दिल्या.
महापौर कार्यालयात ई-बस सेवेसंदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीत ई-बस डेपोची सद्यस्थिती तसेच प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची कामे वेळेत पूर्ण करण्यावर यावेळी चर्चा करण्यात आली.
बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, सभागृहनेते नरेंद्र काळे, आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, माजी महापौर तथा नगरसेविका श्रीकांचना यन्नम, नगरसेवक गौतम कसबे, परिवहन उपक्रमाच्या नियंत्रण अधिकारी सारिका आकुलवार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड