रत्नागिरी : केळशीत सायबर भामट्याने ४ लाखाची रक्कम लांबविली
रत्नागिरी, 30 ऑक्टोबर, (हिं.स.) । केळशी (ता. दापोली) येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत असलेल्या जॉइण्ट सेव्हिंग खात्यातून अज्ञात सायबर भामट्याने ३ लाख ९९ हजार २२९ रुपये परस्पर काढून घेतले. या प्रकरणी फिर्यादी शैलेश गणपत सावंत (वय ४६ वर्षे, सध्या रा. शि
रत्नागिरी : केळशीत सायबर भामट्याने ४ लाखाची रक्कम लांबविली


रत्नागिरी, 30 ऑक्टोबर, (हिं.स.) । केळशी (ता. दापोली) येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत असलेल्या जॉइण्ट सेव्हिंग खात्यातून अज्ञात सायबर भामट्याने ३ लाख ९९ हजार २२९ रुपये परस्पर काढून घेतले. या प्रकरणी फिर्यादी शैलेश गणपत सावंत (वय ४६ वर्षे, सध्या रा. शिवडी, मुंबई, मूळ रा. केळशी कांदेवाडी, ता. दापोली) यांनी दिलेल्या तक्रारीवरून दापोली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सावंत यांचे बँक ऑफ इंडियाच्या केळशी शाखेत जॉइण्ट सेव्हिंग खाते असून, दि. १२ ऑक्टोबर २०२६ ते २२ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत कोणीतरी अज्ञात व्यक्तीने वेगवेगळ्या ट्रॅन्झॅक्शन आयडीचा वापर करत खात्यातील एकूण ३ लाख ९९ हजार २२९ रुपये ७१ पैसे परस्पर ट्रान्सफर करून आर्थिक गंडा घातला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी दापोली पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास अज्ञात आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविला.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande