बॉक्स ऑफिसवर ‘दृश्यम ३’चा जलवा
मुंबई, 05 ऑक्टोबर (हिं.स.)। अजय देवगण यांच्या ‘दृश्यम : द कन्क्लूजन’ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरची दमदार कामगिरी कायम आहे. अभिषेक पाठक यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाने प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी सुमारे ६१ कोटी रुपयांची
DRISHYAM 3 SHINES THE BOX OFFICE


मुंबई, 05 ऑक्टोबर (हिं.स.)। अजय देवगण यांच्या ‘दृश्यम : द कन्क्लूजन’ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरची दमदार कामगिरी कायम आहे. अभिषेक पाठक यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाने प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी सुमारे ६१ कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपटाने पहिल्या दिवशी ६२ कोटी आणि दुसऱ्या दिवशी ५३.५० कोटी रुपयांची कमाई केली होती. अशाप्रकारे भारतात चित्रपटाची एकूण नेट कमाई १७६.५० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तर परदेशी बाजारात तिसऱ्या दिवशी सुमारे २० कोटी रुपयांच्या कमाईसह चित्रपटाची एकूण परदेशी कमाई ६१ कोटी रुपये झाली आहे. जगभरात चित्रपटाने आतापर्यंत सुमारे २७२.८० कोटी रुपये कमावले आहेत.

शानदार ओपनिंगसह ‘दृश्यम : द कन्क्लूजन’ हा अजय देवगण यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक ओपनिंग मिळवणाऱ्या चित्रपटांमध्ये सामील झाला आहे. चित्रपटाने २०२६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘टॉक्सिक’च्या ५५ कोटी, ‘बॉर्डर २’च्या ३० कोटी आणि ‘मिर्झापूर : द मूव्ही’च्या २५.५० कोटी रुपयांच्या सुरुवातीच्या कमाईला मागे टाकले आहे. याशिवाय चित्रपटाने अजय देवगण यांच्या ‘सिंघम अगेन’च्या ४३.५० कोटी आणि ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’च्या १५.१० कोटी रुपयांच्या ओपनिंगच्या आकड्यांनाही मागे टाकले आहे.

‘दृश्यम : द कन्क्लूजन’ हा २०१५ मध्ये आलेल्या ‘दृश्यम’ आणि २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दृश्यम २’च्या कथेचा पुढील भाग आहे. चित्रपटात अजय देवगण यांच्यासोबत तब्बू, श्रिया सरन, जयदीप अहलावत, प्रकाश झा आणि इशिता दत्ता यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तिसऱ्या दिवसापर्यंत १७६ कोटी रुपयांहून अधिकची देशांतर्गत नेट कमाई केलेला हा चित्रपट आता २०० कोटींच्या क्लबमध्ये सहभागी होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. आगामी दिवसांत चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande