
मुंबई, 05 ऑक्टोबर (हिं.स.)। ‘बंदिश बँडिट्स’च्या दोन्ही सीझन आणि अमेझॉन प्राइम व्हिडिओच्या ‘द मेहता बॉईज’ या चित्रपटातील अभिनयामुळे ओळख निर्माण करणारी अभिनेत्री श्रेया चौधरी आता आयुष्मान खुरानासोबत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. श्रेया आगामी ‘मुपापा’ या चित्रपटात आयुष्मानसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. समीर सक्सेना यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट १९ फेब्रुवारी २०२७ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
‘मुपापा’ची निर्मिती यशराज फिल्म्सचे सीईओ अक्षय विधानी आणि पोशम पा पिक्चर्स यांनी संयुक्तपणे केली आहे. या दोन्ही निर्मिती संस्थांचा हा पहिला थिएट्रिकल सहयोग आहे. पोशम पा पिक्चर्सची सह-स्थापना समीर सक्सेना यांनी बिस्वपती सरकार, सौरभ खन्ना आणि अमित गोलानी यांच्यासोबत केली आहे. श्रेया आपल्या सहज अभिनयासाठी आणि व्यक्तिरेखांमध्ये भावनिक खोली सादर करण्याच्या क्षमतेसाठी ओळखली जाते. ‘बंदिश बँडिट्स’मधील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांनी पसंती दिली, तर ‘द मेहता बॉईज’मध्ये तिने आपल्या अभिनयाचे वेगळे रंग दाखवले.
या चित्रपटामुळे श्रेयाच्या कारकिर्दीला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, तिला वायआरएफ टॅलेंटने एक्सक्लुझिव्ह मॅनेजमेंटसाठी करारबद्ध केले आहे. आता ती यशराज फिल्म्सच्या टॅलेंट मॅनेजमेंट आर्मचा भाग आहे. हे व्यासपीठ राणी मुखर्जी, आयुष्मान खुराना, सोनम कपूर, वाणी कपूर, शरवरी, अहान पांडे आणि अनीत पड्डा यांच्यासह अनेक कलाकारांचे प्रतिनिधित्व करते. वायआरएफ टॅलेंट कलाकारांसाठी प्रोजेक्ट्ससोबतच ब्रँड, फॅशन, डिजिटल आणि मनोरंजनाच्या इतर क्षेत्रांमध्ये दीर्घकालीन कारकीर्द घडवण्यावरही लक्ष केंद्रित करते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule