
वॉशिंग्टन, 05 ऑक्टोबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील पिढीतील कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रात अमेरिकेचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी रविवारी ‘सुपर इंटेलिजन्स फोर्स’ नावाच्या कृती दलाची स्थापना करण्याची घोषणा केली. राष्ट्रीय गुप्तचर संचालक जे. क्लेटन यांची या कृती दलाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हे कृती दल सरकारी धोरणांचे केंद्रीकरण करून एआय क्षेत्रातील राष्ट्रीय प्रयत्नांचे नेतृत्व करणार आहे.
ट्रम्प यांनी एआयला ‘सुपर इंटेलिजन्स’ या नावाने नव्याने मांडण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे.गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी व्हाइट हाऊसमध्ये एआय कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी सांगितले की, या कंपन्यांनी एका स्वैच्छिक करारावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाच्या विकासावर स्वतः देखरेख ठेवता येईल, असे ट्रम्प यांनी म्हटले.
रविवारी सोशल मीडियावर पोस्ट करत ट्रम्प यांनी सांगितले की, हे कृती दल सरकारच्या विविध प्रयत्नांमध्ये समन्वय साधेल. “सुपर इंटेलिजन्सच्या क्षेत्रात अमेरिका जगाचे नेतृत्व करत राहील, याची आम्ही खात्री करू,” असे ट्रम्प यांनी म्हटले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode