एअर मार्शल आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख
नवी दिल्ली, 06 ऑक्टोबर (हिं.स.) - एयर मार्शल आशुतोष दीक्षित यांची भारतीय वायुसेनेच्या पुढील प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते 31 ऑक्टोबर रोजी एयर चीफ मार्शल पदाची जबाबदारी स्वीकारतील. त्यांचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2028 पर्यंत असेल. राष्ट्रपतींनी
आशुतोष दीक्षित


नवी दिल्ली, 06 ऑक्टोबर (हिं.स.) - एयर मार्शल आशुतोष दीक्षित यांची भारतीय वायुसेनेच्या पुढील प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते 31 ऑक्टोबर रोजी एयर चीफ मार्शल पदाची जबाबदारी स्वीकारतील. त्यांचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2028 पर्यंत असेल. राष्ट्रपतींनी त्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे.

दीक्षित सध्या वायुसेनेचे उपप्रमुख आहेत. त्यांनी 1 जुलै 2026 रोजी ही जबाबदारी स्वीकारली. ते विद्यमान वायुसेना प्रमुख एयर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह यांची जागा घेतील. अमर प्रीत सिंह 31 ऑक्टोबरला निवृत्त होणार आहेत.

संरक्षण क्षेत्रातील ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाला गती देण्यासाठी आणि स्वदेशी बनावटीचे लढाऊ विमान ‘एलसीए तेजस’सह इतर देशांतर्गत विमान प्रकल्पांना बळ देण्यामध्ये एअर मार्शल दीक्षित यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

आशुतोष दीक्षित यांचा जन्म ९ डिसेंबर १९६६ रोजी झाला. ६ डिसेंबर १९८६ रोजी भारतीय हवाई दलाच्या लढाऊ शाखेत त्यांची नियुक्ती झाली. ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, बांगलादेशातील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज आणि नॅशनल डिफेन्स कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांना 3,500 तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव आहे. त्यांनी मिराज-2000, मिग, जग्वार, तेजस, हॉक यांसह अनेक विमानांचे उड्डाण केले आहे.

तब्बल चार दशकांच्या सेवाकाळात त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण लष्करी कारवाया आणि सरावांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे. कारगिल युद्धादरम्यान राबवण्यात आलेले ‘ऑपरेशन सफेद सागर’, तसेच ‘ऑपरेशन रक्षक’ आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ या मोहिमांमध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. ११ जून २०१९ रोजी त्यांना एअर व्हाइस मार्शल, १ ऑक्टोबर २०२२ रोजी एअर मार्शल आणि १ सप्टेंबर २०२४ रोजी कमांडर-इन-चीफ पदावर बढती मिळाली.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande