ओप्पोची एफ३५ सीरिज भारतात लाँच
मुंबई, 06 ऑक्टोबर, (हिं.स.)। भारतात ओप्पोच्या एफ सीरिजला १० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कंपनीने एफ ३५ सीरिज लाँच केली आहे. यामध्ये ओप्पो एफ ३५ प्रो ५जी आणि ओप्पो एफ ३५ ५जी या स्मार्टफोनचा समावेश आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, एफ सीरिजची सुरुवा
Oppo F35 Series Launched in India


मुंबई, 06 ऑक्टोबर, (हिं.स.)। भारतात ओप्पोच्या एफ सीरिजला १० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कंपनीने एफ ३५ सीरिज लाँच केली आहे. यामध्ये ओप्पो एफ ३५ प्रो ५जी आणि ओप्पो एफ ३५ ५जी या स्मार्टफोनचा समावेश आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, एफ सीरिजची सुरुवात पहिल्या पिढीतील एफ १ सोबत ‘सेल्फी एक्सपर्ट’ म्हणून झाली होती. आता एफ ३५ सीरिजच्या माध्यमातून ही सीरिज ‘ग्रुप सेल्फी एक्सपर्ट’ म्हणून पुढे जात आहे.

ओप्पो इंडियाचे प्रमुख-संचार गोल्डी पटनायक यांनी सांगितले की, नवीन सीरिजमध्ये ५० मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड नेचरल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये १०० डिग्री फील्ड ऑफ व्ह्यू मिळतो. त्यामुळे एका फ्रेममध्ये अधिक लोक आणि क्षण सामावून घेता येणार आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, गेल्या १० वर्षांत भारतात एफ सीरिजच्या ३ कोटींपेक्षा अधिक स्मार्टफोनची विक्री झाली आहे.

ओप्पो एफ३५ प्रो ५जी मध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ७३६० मॅक्स प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये ८ जीबीपर्यंत रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज मिळते. ओप्पो एफ३५ मध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ६३६० मॅक्स प्रोसेसर असून, यामध्ये ८ जीबीपर्यंत रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. हे दोन्ही फोन कलरओएस १६ वर ऑपरेट होतात, जो अँड्रॉइड १६ वर आधारित आहे.

ओप्पो एफ ३५ प्रो ५जीच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत ४५,९९९ रुपये, ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी मॉडेलची किंमत ४९,९९९ रुपये, तर ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी मॉडेलची किंमत ५४,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. तर ओप्पो एफ ३५ ५जीचा ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मॉडेल ३८,९९९ रुपये, तर ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी मॉडेल ४२,९९९ रुपयांना उपलब्ध होईल.

ओप्पो एफ ३५ सीरिजची विक्री ११ ऑक्टोबर २०२६ पासून प्रमुख किरकोळ दुकानांमध्ये, ओप्पो इंडिया ई-स्टोअर, फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवर सुरू होईल. एफ ३५ प्रो ५जी सनराइज ऑरेंज, वेव्ह ब्लू आणि ट्वायलाइट ब्राउन या रंगांमध्ये, तर एफ ३५ ५जी वेव्ह ब्लू, टायटॅनियम ग्रे आणि मिस्ट पिंक या रंगांमध्ये उपलब्ध असेल. ग्राहकांना १० टक्क्यांपर्यंत तत्काळ कॅश डिस्काउंट, अतिरिक्त व्याज नसलेली हप्त्याची सुविधा, १० टक्क्यांपर्यंत एक्सचेंज बोनस आणि शून्य आगाऊ पेमेंट योजनेचा लाभ मिळेल. निवडक ओप्पो उत्पादने आणि सेवांवर अतिरिक्त सणासुदीच्या ऑफर्सही दिल्या जाणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande