आरबीआय गव्हर्नर बुधवारी पतधोरण समितीच्या निर्णयांची करणार घोषणा
नवी दिल्ली, 06 ऑक्टोबर (हिं.स.)। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)चे गव्हर्नर संजय मल्होत्रा ७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता तीन दिवसीय द्विमासिक पतधोरण समिती (एमपीसी)च्या निर्णयांची घोषणा करतील. यानंतर दुपारी १२ वाजता पत्रकार परिषदही होणार आहे. आर्थिक
RBI Governor will announce monetary policy decisio


नवी दिल्ली, 06 ऑक्टोबर (हिं.स.)। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)चे गव्हर्नर संजय मल्होत्रा ७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता तीन दिवसीय द्विमासिक पतधोरण समिती (एमपीसी)च्या निर्णयांची घोषणा करतील. यानंतर दुपारी १२ वाजता पत्रकार परिषदही होणार आहे. आर्थिक क्षेत्रातील जाणकारांनी आरबीआयच्या धोरणात्मक व्याजदर असलेल्या रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली पतधोरण समितीने (एमपीसी) आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि प्रमुख धोरणात्मक दरांवर निर्णय घेण्यासाठी सोमवारी मुंबईत आपली तीन दिवसीय आढावा बैठक सुरू केली. रिझर्व्ह बँकेने सांगितले की, ७ ऑक्टोबर रोजी मॉनेटरी पॉलिसी स्टेटमेंट आणि मॉनेटरी पॉलिसीनंतर होणाऱ्या पत्रकार परिषदेचे लाइव्ह स्ट्रीम पाहता येणार आहे. यासाठी दिलेल्या लिंकद्वारे सकाळी १० वाजता मॉनेटरी पॉलिसी स्टेटमेंट आणि दुपारी १२ वाजता मॉनेटरी पॉलिसीनंतरच्या पत्रकार परिषदेसाठी सहभागी होता येईल.

अर्थतज्ज्ञ आणि बँक अधिकाऱ्यांचे मत आहे की, पश्चिम आशियात सुरू असलेल्या संकटामुळे पुन्हा निर्माण झालेल्या महागाईच्या दबावाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑक्टोबर महिन्यातील मौद्रिक धोरणाच्या आढाव्यात रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांची वाढ करू शकते. यापूर्वी ब्रोकरेज फर्म नोमुराने ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान होणाऱ्या मौद्रिक धोरणाच्या बैठकींमध्ये धोरणात्मक दर असलेल्या रेपो रेटमध्ये प्रत्येकी ०.२५ टक्क्यांची वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

आरबीआयने ऑगस्टमध्ये झालेल्या मागील एमपीसी बैठकीत रेपो रेट ५.२५ टक्क्यांवर कायम ठेवला होता. वर्ष २०२५ मध्ये रेपो रेटमध्ये एकूण १.२५ टक्क्यांची कपात केल्यानंतर मागील सलग चार बैठकांमध्ये रेपो रेट ५.२५ टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande