राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी लातूरच्या पाच खेळाडूंची निवड
लातूर, 08 ऑक्टोबर (हिं.स.)। नांदेड येथील गुरुगोविंद सिंग जिल्हा क्रीडा संकुलात पार पडलेल्या लातूर विभागस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत लातूरच्या पाच खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनाल
खेळाडूंची निवड


लातूर, 08 ऑक्टोबर (हिं.स.)। नांदेड येथील गुरुगोविंद सिंग जिल्हा क्रीडा संकुलात पार पडलेल्या लातूर विभागस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत लातूरच्या पाच खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने मुर्तीजापूर येथे ७ ते ९ ऑक्टोबरदरम्यान राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत १७ वर्षांखालील वयोगटात लातूरच्या श्री केशवराज विद्यालयातील वैष्णवी माळी आणि श्रावणी मोरे या दोन खेळाडू सहभागी झाल्या आहेत. ८ आणि ९ ऑक्टोबर रोजी मुर्तीजापूर येथे या स्पर्धेतील सामने होणार आहेत.

लातूरच्या खेळाडूंनी विभागस्तरीय स्पर्धेत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर राज्यस्तरावर स्थान मिळवले असून, या स्पर्धेतही ते उत्कृष्ट कामगिरी करतील, असा विश्वास आशियाई तायक्वांदो प्रशिक्षक नेताजी जाधव यांनी व्यक्त केला.

मान्यवरांकडून खेळाडूंना शुभेच्छा

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी लातूरच्या खेळाडूंची निवड झाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत. लातूर विभाग क्रीडा उपसंचालक मिलिंद दीक्षित, जिल्हा क्रीडा अधिकारी जयराज मुंडे, क्रीडा विभागातील अधिकारी, भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे पदाधिकारी, तायक्वांदो जिल्हा संघटनेचे पदाधिकारी तसेच खेळाडूंच्या पालकांनी त्यांचे अभिनंदन केले.

याशिवाय स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, छत्रपती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील, देवणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अण्णाराव खोडेवाड, श्री राजा नारायण लाहोटी इंग्लिश स्कूलचे रजिस्टार प्रवीण शिवणगीकर, तसेच क्रीडा शिक्षक प्रयागराज गरुड आणि गुरुनाथ झुंजारे यांनीही निवड झालेल्या खेळाडूंना स्पर्धेतील यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande