जेएसडब्ल्यू सिमेंटने उत्तर भारतातील आपली प्रादेशिक क्षमता केली बळकट
मुंबई, 08 ऑक्टोबर (हिं.स.)। भारतातील आघाडीच्या हरित सिमेंट उत्पादकांपैकी एक आणि विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत जेएसडब्ल्यू समूहाचा भाग असलेल्या जेएसडब्ल्यू सिमेंट कंपनीने आज नागौर, राजस्थान येथे अतिरिक्त 1.00 एमटीपीए सिमेंट ग्राइंडिंग युनिट यशस्वीरीत
सिमेंट


मुंबई, 08 ऑक्टोबर (हिं.स.)। भारतातील आघाडीच्या हरित सिमेंट उत्पादकांपैकी एक आणि विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत जेएसडब्ल्यू समूहाचा भाग असलेल्या जेएसडब्ल्यू सिमेंट कंपनीने आज नागौर, राजस्थान येथे अतिरिक्त 1.00 एमटीपीए सिमेंट ग्राइंडिंग युनिट यशस्वीरीत्या कार्यान्वित केल्याची घोषणा केली. हे युनिट सुरु केल्याने कंपनीच्या विकास धोरणातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे.

या युनिटच्या कार्यान्वयनासह जेएसडब्ल्यू सिमेंटची एकूण सिमेंट ग्राइंडिंग क्षमता वाढून 25.10 एमटीपीए झाली आहे. तसेच, जेएसडब्ल्यू सिमेंट एफझेडसी या संयुक्त उपक्रमातील क्लिंकर क्षमतेसह कंपनीची एकूण क्लिंकर उत्पादन क्षमता 9.74 एमटीपीए झाली आहे.

जेएसडब्ल्यू सिमेंटने मार्च 2026 मध्ये नागौर इंटिग्रेटेड प्लांटच्या माध्यमातून उत्तर भारतात आपले कामकाज सुरू केले होते. या प्रकल्पामध्ये 3.30 एमटीपीए क्षमतेचे क्लिंकरायझेशन युनिट आणि 2.50 एमटीपीए क्षमतेचे सिमेंट ग्राइंडिंग युनिट यांचा समावेश आहे. अतिरिक्त 1.00 एमटीपीए क्षमतेचे सिमेंट ग्राइंडिंग युनिट कार्यान्वित झाल्यामुळे या प्रकल्पाची एकूण सिमेंट ग्राइंडिंग क्षमता 3.50 एमटीपीए झाली आहे. यामुळे राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर) या भागांमध्ये वाढत असलेल्या सिमेंटच्या मागणीची पूर्तता करण्याची कंपनीची क्षमता अधिक मजबूत झाली आहे. या विस्तारासाठी इक्विटी आणि दीर्घकालीन डेब्ट यांच्या धोरणात्मक मिश्रणातून निधी उभारण्यात आला आहे.

30 सप्टेंबर 2026 रोजी संपलेल्या तिमाहीदरम्यान जेएसडब्ल्यू सिमेंटने नागौर इंटिग्रेटेड प्लांट येथे अल्टरनेट फ्युएल हँडलिंग सिस्टम आणि वेस्ट हीट रिकव्हरी सिस्टम (डब्ल्यूएचआरएस) देखील कार्यान्वित केली आहे.

याबाबत आज घोषणा करताना जेएसडब्ल्यू सिमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. निलेश नार्वेकर म्हणाले, “नागौर येथे अतिरिक्त 1.00 एमटीपीए ग्राइंडिंग क्षमता कार्यान्वित करणे ही आमच्यासाठी एक महत्त्वाची धोरणात्मक प्राथमिकता आहे आणि यामुळे जेएसडब्ल्यू सिमेंटचा उत्तर भारतातील विस्तार अधिक वेगाने होईल. या प्रदेशाच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि एनसीआर क्षेत्राच्या आर्थिक विकासात योगदान देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. कंपनीने अपेक्षित कालमर्यादेत हे ग्राइंडिंग युनिट कार्यान्वित केले आहे हे सांगताना मला आनंद होत आहे. यातून आमची प्रकल्प अंमलबजावणी क्षमता अधोरेखित होते. याशिवाय, अल्टरनेट फ्युएल हँडलिंग सिस्टम आणि वेस्ट हीट रिकव्हरी सिस्टम (डब्ल्यूएचआरएस) यामुळे आगामी काळात आमच्या उत्पादन खर्चात लक्षणीय घट होण्याची अपेक्षा आहे.”

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande