
मुंबई, 08 ऑक्टोबर, (हिं.स.)। आयसीआयसीआय बँकेचा वार्षिक ‘फेस्टिव्ह बोनान्झा’ पुन्हा एकदा सादर झाला असून ऑनलाइन शॉपिंग, मोबाइल फोन, इलेक्ट्रॉनिक्स, प्रवास, फर्निचर आणि होम डेकोर, फॅशन, क्विक कॉमर्स आणि अन्य क्षेत्रांतील आघाडीच्या ब्रँड्सवर आकर्षक ऑफर्स देण्यात आल्या आहेत. आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट/डेबिट कार्ड्स, इंटरनेट बँकिंग, कार्डलेस ईएमआय आणि नो-कॉस्ट ईएमआय पर्यायांचा वापर करून ग्राहक विशेष डील्स, सवलती आणि कॅशबॅकचा लाभ घेऊ शकतात.
बँकेने फ्लिपकार्टसोबत त्यांच्या बिग बिलियन डेज सेलसाठी भागीदारी केली आहे. हा सेल 8 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होणार असून, त्यामध्ये ग्राहकांना विविध उत्पादनांवर 10% सवलत मिळू शकते.
बँक नवीन आयफोन ड्युओ^, आयफोन 18 प्रो आणि प्रो मॅक्सवर 7,000 रु. पर्यंत इन्स्टंट कॅशबॅक, तसेच काही ॲपल उत्पादनांवर 15,000 रु. पर्यंत कॅशबॅक देत आहे. आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट कार्डधारक ॲपलच्या ‘आयफोन फॉर लाइफ’ कार्यक्रमाचाही विशेष लाभ घेऊ शकतात. या कार्यक्रमांतर्गत निवडक आयफोन मॉडेल्ससाठी 24 महिन्यांच्या व्याजमुक्त हप्त्यांमध्ये, 2,497 रु. पासून सुरू होणाऱ्या रकमेतून, पेमेंट करता येते. तसेच, ग्राहक पुढील आयफोनमध्ये अपग्रेड करताना त्यांच्या विद्यमान आयफोनसाठी खात्रीशीर बायबॅक पर्यायाचाही लाभ घेऊ शकतात.
बँकेने गुगल पिक्सेल, एलजी, सोनी, सॅमसंग, हायर, एचपी, डेल, क्रोमा, रिलायन्स डिजिटल, विजय सेल्स, एअर इंडिया, मेकमायट्रिप, गोआयबिबो, यात्रा, अजिओ, टाटा क्लिक, ब्लिंकिट, अर्बन लॅडर आणि पेपरफ्राय यांसारख्या अन्य आघाडीच्या ब्रँड्ससोबतही भागीदारी केली आहे.
ऑफर्सबाबत बोलताना, आयसीआयसीआय बँकेच्या प्रवक्त्यांनी सांगितले, “सणासुदीचा काळ हा आनंद आणि एकत्र येण्याचा असतो आणि आम्हाला तो आणखी खास बनवायचा आहे. यंदाच्या ‘फेस्टिव्ह बोनान्झा’च्या माध्यमातून आम्ही आघाडीच्या ब्रँड्ससोबत भागीदारी केली आहे. त्यामुळे आमच्या ग्राहकांचा शॉपिंगचा अनुभव अधिक फायदेशीर, सोयीस्कर आणि संस्मरणीय होईल अशा आकर्षक ऑफर्स आम्ही उपलब्ध करून देत आहोत. आयसीआयसीआय बँकेची क्रेडिट आणि डेबिट कार्ड्स, क्रेडिट कार्ड ईएमआय आणि इंटरनेट बँकिंगचा वापर करून आमचे ग्राहक या ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात.”
इतर प्रमुख ऑफर्स* पुढीलप्रमाणे:
• मोबाइल फोन: गुगल पिक्सेल 11 आणि शाओमी स्मार्टफोन्सवर 10,000 रु. पर्यंत सवलत, तसेच ओप्पो आणि वनप्लस फोनवर 5,000 रु. पर्यंत सवलत.
• फॅशन: टाटा क्लिक आणि अजिओवर शॉपिंग केल्यास 12% पर्यंत सवलत.
• इलेक्ट्रॉनिक्स: एलजी, सॅमसंग, हायर, सोनी, एचपी, मायक्रोसॉफ्ट सरफेस आणि जेबीएल यांसह अन्य ब्रँड्सच्या उत्पादनांवर 30,000 रु. पर्यंत सवलत. याशिवाय, क्रोमा, रिलायन्स डिजिटल आणि विजय सेल्स येथे विविध उत्पादनांवर आकर्षक सवलतींचा ग्राहकांना लाभ घेता येईल.
• प्रवास: मेकमायट्रिप, गोआयबिबो, यात्रा, ईझमायट्रिप, इक्सिगो, पेटीएम फ्लाइट्स यांसारख्या ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मवर फ्लाइट्स, हॉटेल्स आणि हॉलिडे पॅकेजेसवर 35,000 रु. पर्यंत सवलत. तसेच, एअर इंडियाच्या वेबसाइटद्वारे त्यांच्या फ्लाइट बुकिंगवर 10% सवलत.
• फर्निचर आणि होम डेकोर: पेपरफ्राय, अर्बन लॅडर, द स्लीप कंपनी, स्लीपीहेड, ड्युरोफ्लेक्स, बोनिटो डिझाइन्स, इंटिरिअर कंपनी आणि फर्निसेलनवर 30% पर्यंत सवलत.
• क्विक कॉमर्स: फ्लिपकार्ट मिनिट्स, ब्लिंकिट आणि झेप्टोद्वारे किराणा आणि अन्य वस्तूंच्या खरेदीवर सवलती.
• विशेष ऑफर्स: ॲव्हिस, कॉर्डेलिया क्रूझेस, पिकयुअरट्रेल, नॅशर माइल्स, फर्न्स एन पेटल्स, आयजीपी, एलिव्हास आणि अन्य ब्रँड्सवर 35% पर्यंत सवलत.
आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्ड्सवरील इतर वर्षभर उपलब्ध फायदे:
• ॲमेझॉन पे आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डचा वापर करून ॲमेझॉनवरील खरेदीवर* ग्राहकांना 5% पर्यंत रिवॉर्ड पॉइंट्स मिळू शकतात.
• मेकमायट्रिप आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डचा वापर करून मेकमायट्रिपवर बुकिंग केल्यास 6% पर्यंत मायकॅश मिळवता येऊ शकते.
• अदानी वन आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डचा वापर करून अदानी वन इकोसिस्टम* मध्ये 7% पर्यंत रिवॉर्ड पॉइंट्स मिळवता येऊ शकतात.
*ऑफर्सवर नियम व अटी लागू.
^ऑफर लॉन्चनंतर लागू.
‘फेस्टिव्ह बोनान्झा’ ऑफर्सची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि त्यांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या:
https://www.icici.bank.in/campaigns/bonanza/index
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर