विद्यार्थिनींच्या लैंगिक छळप्रकरणी आदर्श स्कूलच्या संस्थापकाला अटक
लातूर, ८ ऑक्टोबर (हिं.स.) : अल्पवयीन विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाच्या आरोपांप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेल्या आदर्श इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थापकाला लातूर पोलिसांनी अखेर अटक केली. बशीर उस्मान शेख (वय ५४, रा. प्रकाश नगर, लातूर) असे अटक करण
आरोपीला बेड्या


लातूर, ८ ऑक्टोबर (हिं.स.) : अल्पवयीन विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाच्या आरोपांप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेल्या आदर्श इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थापकाला लातूर पोलिसांनी अखेर अटक केली. बशीर उस्मान शेख (वय ५४, रा. प्रकाश नगर, लातूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६८७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम ७४, ७६, ३५१(२) तसेच पॉक्सो कायद्याच्या कलम ८ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होण्याच्या एक दिवस आधीच आरोपी फरार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.

तीन विशेष पथकांकडून शोधमोहीम

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीचा तातडीने शोध घेण्यासाठी लातूर पोलिसांनी तीन विशेष पथके तयार केली. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि लातूर शहरचे उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक समाधान चावरे यांच्या नेतृत्वाखाली ही पथके कार्यरत होती.तीन अधिकारी आणि १२ पोलीस अंमलदारांचा समावेश असलेल्या या पथकांनी आरोपीच्या शोधासाठी उदगीर, उमरगा, पुणे, पनवेल आणि पालघर आदी ठिकाणी तपास व शोधमोहीम राबविली. गोपनीय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा माग काढण्याचे प्रयत्न करण्यात आले.पोलिसांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर आरोपीचा शोध घेण्यात यश आले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अटक करण्यात आली.

पोलीस अधीक्षकांकडून प्रकरणाचा आढावा

अल्पवयीन मुली, विद्यार्थी आणि महिलांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये तातडीने कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सदर प्रकरणाच्या तपासाचा त्यांनी सातत्याने आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.

------------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande