काही निवडक उद्योगपती 'स्टारलिंक'च्या भारतातील प्रवेशात अडथळा आणत आहेत– एलन मस्क
वॉशिंग्टन, 08 ऑक्टोबर (हिं.स.)।टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक एलन मस्क यांनी भारतातील काही निवडक उद्योगपती आपली मक्तेदारी कायम ठेवण्यासाठी त्यांच्या सॅटेलाइट इंटरनेट सेवा स्टारलिंकच्या मार्गात अडथळे निर्माण करत असल्याचा मोठा आरोप केला आहे. मस्क यांनी
काही निवडक उद्योगपती 'स्टारलिंक'च्या भारतातील प्रवेशात अडथळा आणत आहेत– एलन मस्क


वॉशिंग्टन, 08 ऑक्टोबर (हिं.स.)।टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक एलन मस्क यांनी भारतातील काही निवडक उद्योगपती आपली मक्तेदारी कायम ठेवण्यासाठी त्यांच्या सॅटेलाइट इंटरनेट सेवा स्टारलिंकच्या मार्गात अडथळे निर्माण करत असल्याचा मोठा आरोप केला आहे.

मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये आरोप केला आहे की, “दुर्दैवाने, भारतीय जनतेवरील आपली मक्तेदारी कायम ठेवण्यासाठी काही ठरावीक लोक आम्हाला रोखत आहेत. ते कोण आहेत, याचा तुम्ही अंदाज लावू शकता का? हा भारतातील जनतेविरोधातील गुन्हा आहे.”मस्क यांच्या म्हणण्यानुसार, ज्या दुर्गम गावांमध्ये आणि भागांमध्ये आजही हाय-स्पीड ब्रॉडबँड इंटरनेटची सुविधा पोहोचलेली नाही किंवा जिथे सध्याच्या इंटरनेट सेवा अत्यंत महाग आहेत, अशा ठिकाणी स्टारलिंकला हाय-स्पीड इंटरनेट पोहोचवायचे आहे.दुसरीकडे, स्टारलिंकने भारतात सेवा सुरू करण्यासाठी आपण पूर्णपणे तयार असल्याचा दावा केला आहे. सरकारकडून हिरवा कंदील मिळताच सेवा सुरू केली जाईल, असे कंपनीचे म्हणणे आहे.

‘इंडिया मोबाइल काँग्रेस’ दरम्यान स्टारलिंकच्या बिझनेस ऑपरेशन्सच्या उपाध्यक्षा लॉरेन ड्रायर यांनी सांगितले की, कंपनीने भारतात २० गेटवे साइट्स तयार केल्या आहेत. तसेच भारतीय नागरिकांचा डेटा देशातच सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष सुरक्षा व्यवस्थाही करण्यात आली आहे.मात्र, एकीकडे स्टारलिंकने परवाना आणि आवश्यक पायाभूत सुविधा तयार केल्या असताना, दुसरीकडे बाजारात अशी चर्चा आहे की सुनील भारती मित्तल समर्थित ‘यूटेलसॅट वनवेब’ आणि मुकेश अंबानी यांच्या ‘रिलायन्स जिओ’ला स्पेक्ट्रम वाटपात प्राधान्य मिळू शकते.

दूरसंचार नियामकाच्या शिफारशींनुसार, सॅटेलाइट सेवा पुरवठादारांना पाच वर्षांसाठी स्पेक्ट्रम दिले जाईल. त्यासाठी त्यांना त्यांच्या अॅडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यूच्या (AGR) ५ टक्के स्पेक्ट्रम यूसेज चार्ज (SUC) द्यावा लागेल.मात्र, ग्रामीण आणि दुर्गम भागांसाठी हा शुल्कदर कमी असण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande