
परभणी, 09 ऑक्टोबर (हिं.स.)।
परभणी तालुक्यातील मिरखेल येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह 91 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.चोरट्यांनी गावात तीन ते चार ठिकाणी घरफोडी केल्याची माहिती असून, या प्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आकाश शंकर गिरी यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. फिर्यादी यांच्या आजी गावातील रुक्मिणीबाई देशमुख यांच्या घरी झोपण्यासाठी गेल्या होत्या. तर खोलीतील पंखा जळाल्याने फिर्यादी घराच्या छतावर झोपले होते. गुरुवारी सकाळी आजीने आरडाओरड केल्याने फिर्यादी छतावरून खाली आले. घरात जाऊन पाहणी केली असता साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले.चोरट्यांनी घरातून सोन्याचे गंठण, मणी-मंगळसूत्र, कानातील बाळ्या आणि रोख रक्कम असा एकूण 91 हजार 360 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी ताडकळस पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis