मातृभक्त मोनू सिंगचे परळीत अभूतपूर्व स्वागत!
बीड, 09 ऑक्टोबर (हिं.स.)। नगराध्यक्षांकडून औक्षण; ढोल-ताशांच्या गजरात परळीकरांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद आईच्या आरोग्यासाठी १७ हजार किमीची धावती तीर्थयात्रा; १२ ज्योतिर्लिंगांसह चारधाम दर्शनाचा संकल्प : आईच्या आरोग्यासाठी केलेला नवस पूर्ण करण्
मोनू सिंग


बीड, 09 ऑक्टोबर (हिं.स.)।

नगराध्यक्षांकडून औक्षण; ढोल-ताशांच्या गजरात परळीकरांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद

आईच्या आरोग्यासाठी १७ हजार किमीची धावती तीर्थयात्रा; १२ ज्योतिर्लिंगांसह चारधाम दर्शनाचा संकल्प

: आईच्या आरोग्यासाठी केलेला नवस पूर्ण करण्यासाठी बिहारपासून धावत तीर्थयात्रेला निघालेल्या १९ वर्षीय मोनू सिंग ऊर्फ ‘मोनू ब्लॅक पँथर’ याचे परळी वैजनाथ नगरीत उत्साहात स्वागत करण्यात आले. नगराध्यक्षांच्या हस्ते औक्षण, ढोल-ताशांचा गजर आणि हारतुरे देत परळीकरांनी त्याचे स्वागत केले. या प्रेमळ प्रतिसादाने मोनू भारावून गेला.

आई लालती देवी यांची प्रकृती गंभीर असताना, त्या बऱ्या झाल्यास १२ ज्योतिर्लिंग आणि चारधामांची यात्रा धावत पूर्ण करण्याचा संकल्प मोनूने केला होता. आईच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर १५ मार्च २०२६ रोजी त्याने पाटणा येथून यात्रेला सुरुवात केली. दररोज सुमारे ५० किलोमीटर धावत तो आपले ध्येय गाठण्यासाठी पुढे जात आहे.

सुमारे १७ हजार किलोमीटरच्या या धाडसी प्रवासातील महत्त्वाच्या टप्प्यावर मोनूचे परळी वैजनाथमध्ये आगमन झाले. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या नगरीत मिळालेल्या उत्स्फूर्त स्वागतामुळे त्याच्या यात्रेला विशेष भावनिक महत्त्व प्राप्त झाले.

मातृप्रेमातून मिळाली जिद्दीची प्रेरणा

आईच्या आरोग्यासाठी केलेला नवस पूर्ण करण्याची तळमळ, त्यासाठी घेतलेले अथक परिश्रम आणि श्रद्धेच्या बळावर सुरू असलेली धावती यात्रा यांमुळे मोनू सिंगची कहाणी लक्षवेधी ठरत आहे. त्याच्या जिद्दीचे आणि मातृभक्तीचे परळीकरांकडून कौतुक होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande