केंद्रीय पथकाची गेवराई आणि बीड तालुक्यांतील विविध गावांना भेटी
बीड, 09 ऑक्टोबर (हिं.स.)। मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाने बीड जिल्ह्यातील गेवराई आणि बीड तालुक्यांतील विविध गावांना भेटी देऊन पिकांच्या नुकसानीचा आणि पाणीटंचाईचा आढावा घेतला. कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे स
पाहणी  दौरा


बीड, 09 ऑक्टोबर (हिं.स.)।

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाने बीड जिल्ह्यातील गेवराई आणि बीड तालुक्यांतील विविध गावांना भेटी देऊन पिकांच्या नुकसानीचा आणि पाणीटंचाईचा आढावा घेतला.

कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संयुक्त सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मुक्तानंद अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील या पथकाने शेतशिवारात जाऊन पिकांची स्थिती, जलस्रोतांची उपलब्धता आणि दुष्काळाचे परिणाम जाणून घेतले. पावसाच्या दीर्घ खंडामुळे शेतकऱ्यांनी केलेला खर्च आणि मेहनत वाया जाण्याची परिस्थिती या दौऱ्यात समोर आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande