छ. संभाजीनगर - भोकरदन येथे आयोजित भिल्ल समाजाच्या समस्या निराकरण व मार्गदर्शन मेळावा
छत्रपती संभाजीनगर, 01 नोव्हेंबर, (हिं.स.)। भोकरदन येथे आयोजित भिल्ल समाजाच्या समस्या निराकरण व मार्गदर्शन मेळाव्याच्या निमित्ताने माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी समाजबांधवांशी संवाद साधला. यासाठी एकलव्य संघटनेच्या वतीने पुढाकार घेण्यात आला होता.
म


छत्रपती संभाजीनगर, 01 नोव्हेंबर, (हिं.स.)। भोकरदन येथे आयोजित भिल्ल समाजाच्या समस्या निराकरण व मार्गदर्शन मेळाव्याच्या निमित्ताने माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी समाजबांधवांशी संवाद साधला. यासाठी एकलव्य संघटनेच्या वतीने पुढाकार घेण्यात आला होता.

भिल्ल समाज हा आजही सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या अतिशय मागासलेला समाज आहे. या समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संघटनेने अधिक प्रभावीपणे काम करणे गरजेचे आहे. त्यासाठी संघटनेचे कार्य केवळ स्थानिक किंवा जिल्हास्तरापुरते मर्यादित न राहता राज्यस्तरावर व्यापक स्वरूपात पोहोचणे आवश्यक आहे.

यावेळी समाजाच्या विविध समस्या जाणून घेतल्या. प्रामुख्याने शबरी घरकुल योजना, गायरान जमिनींचे पंचनामे, शासकीय कार्यालयांमधील प्रलंबित प्रश्न यांसह विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संघटनेला योग्य ती जबाबदारी देऊन शासन व प्रशासनाच्या माध्यमातून समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी भविष्यात निश्चितपणे प्रयत्न केले जातील, असे आश्वासन यावेळी दिले.

समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवणे, त्यांना शिक्षणाच्या व विकासाच्या प्रवाहात आणणे आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटितपणे लढा देणे ही काळाची गरज आहे.

या मेळाव्याला जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून तसेच गावागावांतून भिल्ल समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गजानन बरडे, प्रदेश सचिव गुलाबराव गायकवाड, कार्याध्यक्ष संभाजी बरडे, संघटक विजय बरडे, सचिव प्रभाकर पवार यांच्यासह संघटनेचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समाजाचा विकास, हक्कांचे संरक्षण आणि सर्वांगीण उन्नती यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande