
लातूर, 01 नोव्हेंबर (हिं.स.)।
: विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने महिलांच्या स्वावलंबनाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘महिला उद्योजिका दिवाळी बाजार २०२६’ ला सुरुवात झाली आहे. ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या तीन दिवसांच्या प्रदर्शनातून बचत गटातील महिला उद्योजिकांना आपल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.
‘स्वावलंबनाची दिशा, महिलांच्या हाती व्यवसायाची संधी!’ या संकल्पनेतून आयोजित या प्रदर्शनात महिला उद्योजिकांनी विविध आकर्षक वस्तूंचे स्टॉल्स उभारले आहेत. यामध्ये गृहउपयोगी वस्तू, हस्तकला व कलाकुसरीचे साहित्य, खाद्यपदार्थ, दिवाळी फराळ, पारंपरिक आकाशकंदील, पणत्या तसेच दिवाळी सजावटीच्या साहित्याचा समावेश आहे.
या बाजारपेठेमुळे महिला बचत गटांच्या उत्पादनांना ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळत असून, महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना मिळत आहे. दिवाळीच्या खरेदीसोबतच स्थानिक महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis