
छत्रपती संभाजीनगर, 01 नोव्हेंबर (हिं.स.)। सोयगाव तालुक्यातील फर्दापूर परिसरातील सावळतबारा पंचायत समिती सर्कलमधील नांदागाव येथे महान पराक्रमी योद्धे आणि स्वाभिमानाचे प्रतीक महाराणा प्रताप यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
महाराणा प्रताप यांचे जीवन म्हणजे मातृभूमीच्या रक्षणासाठी केलेला संघर्ष, स्वाभिमानासाठी दिलेला लढा आणि राष्ट्रनिष्ठेचा जाज्वल्य इतिहास! अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आपल्या तत्त्वांशी कधीही तडजोड केली नाही. त्यांचे शौर्य, त्याग आणि पराक्रम आजही देशातील प्रत्येक नागरिकाला प्रेरणा देणारे आहेत.
नांदागाव येथे उभारण्यात आलेला महाराणा प्रताप यांचा हा पुतळा भावी पिढ्यांना त्यांच्या महान कार्याची आणि विचारांची सदैव आठवण करून देत राहील.
याप्रसंगी भाजप छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष श्री. सुरेश बनकर, भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष श्री. इद्रिस मुलतानी, करणी सेना प्रदेशाध्यक्ष श्री. प्रवीण सिंह पाटील, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर मोटे, राधाकिसन काकडे, सुनील मिरकर, वृषालीताई मिरकर, सोयगाव तालुका पंचायत समितीचे सभापती उत्तम भाऊ चव्हाण, यांच्यासह गावातील मान्यवर, महिला भगिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis