रत्नागिरी : अंजणारी पुलावर कंटेनर अपघातात सहायक पोलीस फौजदारासह दोघांचा मृत्यू
रत्नागिरी, 1 नोव्हेंबर (हिं.स.) । मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी पुलाजवळ शनिवारी, दि. 31 ऑक्टोबर रोजी रात्री अकराच्या सुमारास झालेल्या अपघातात सहाय्यक पोलीस फौजदारासह कंटेनरचालकाचा मृत्यू झाला. लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या कंटेनरने हातखंबा पोलीस
सहायक पोलीस फौजदार संतोष गायकवाड


रत्नागिरी, 1 नोव्हेंबर (हिं.स.) । मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी पुलाजवळ शनिवारी, दि. 31 ऑक्टोबर रोजी रात्री अकराच्या सुमारास झालेल्या अपघातात सहाय्यक पोलीस फौजदारासह कंटेनरचालकाचा मृत्यू झाला.

लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या कंटेनरने हातखंबा पोलीस वाहतूक शाखेच्या शासकीय वाहनाला मागून जोरदार धडक दिली. या धडकेनंतर पोलीस वाहन अंजणारी नदीच्या दिशेने खोल उतारावर उलटले. या अपघातात सहाय्यक फौजदार संतोष गायकवाड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर कंटेनर चालकाचाही मृत्यू झाला असून पोलीस कॉन्स्टेबल अनिल शिंगाडे गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हातखंबा वाहतूक शाखेचे शासकीय वाहन (एमएच ०८ बीई ३५६१) अंजणारी पुलाजवळून जात असताना मागून आलेल्या कंटेनरने (आरजे ०९ जीई २३९७) त्याला जोरदार धडक दिली. धडकेच्या जोरामुळे पोलीस वाहन रस्त्याच्या बाजूला असलेल्या खोल उतारावर उलटले. तर कंटेनरही रस्त्याशेजारी उलटला.

अपघातात जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र सहाय्यक फौजदार संतोष गायकवाड यांचा मृत्यू झाला. पोलीस कॉन्स्टेबल अनिल शिंगाडे यांची प्रकृती गंभीर आहे. कंटेनर चालकाचाही गंभीर जखमी अवस्थेत मृत्यू झाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande