तिबेटच्या धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप थांबवा; अमेरिकेचा चीनला इशारा
वॉशिंग्टन, 01 नोव्हेंबर (हिं.स.)।तिबेटमधील एका बौद्ध मठात धर्मगुरूंच्या निवासस्थानांची तोडफोड केल्याप्रकरणी अमेरिकेने चीनवर टीका केली आहे. तसेच तिबेटच्या धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये, असे आवाहनही चीनला केले आहे.भारताच्या धर्मशाळा येथे असलेल
तिबेटच्या धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप थांबवा; अमेरिकेचा चीनला इशारा


वॉशिंग्टन, 01 नोव्हेंबर (हिं.स.)।तिबेटमधील एका बौद्ध मठात धर्मगुरूंच्या निवासस्थानांची तोडफोड केल्याप्रकरणी अमेरिकेने चीनवर टीका केली आहे. तसेच तिबेटच्या धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये, असे आवाहनही चीनला केले आहे.भारताच्या धर्मशाळा येथे असलेल्या तिबेटच्या निर्वासित सरकारने म्हणजेच केंद्रीय तिबेट प्रशासनाने (सीटीए) देखील या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, चिनी अधिकाऱ्यांनी २५ आणि २६ ऑक्टोबर रोजी तिबेट स्वायत्त प्रदेशातील कार्दजे (गांजी) प्रांतातील सेरशुल काउंटीमध्ये पाडकामाची मोहीम राबवली होती. या कारवाईदरम्यान द्जा सेरशुल थेकचेन दार्ग्येलिंग मठातील सुमारे २०० धर्मगुरूंची निवासस्थाने जमीनदोस्त करण्यात आली. माहितीनुसार, घटनास्थळी आता काहीही शिल्लक राहिलेले नाही. संपूर्ण परिसरातील बांधकामे पाडण्यात आली आहेत.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी माध्यमांना सांगितले की, तिबेटमधील आध्यात्मिक संस्था, धार्मिक शिक्षण आणि मठीय जीवनावर नियंत्रण मिळवण्याच्या चीन सरकारच्या व्यापक प्रयत्नांचाच हा तोडफोडीचा प्रकार एक भाग आहे. दरम्यान, केंद्रीय तिबेट प्रशासनाचे प्रवक्ते तेनझिन लेकशे यांनी सांगितले की, चीन सरकार सातत्याने तिबेटी नागरिकांनी स्थापन केलेले मठ आणि शाळा बंद करण्याचे प्रयत्न करत आहे. तसेच तिबेटी नागरिकांची राष्ट्रीय ओळख पुसून टाकण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande