लातूर - ऊसदराच्या मागण्यांसाठी सर्वपक्षीय संघटना एकवटल्या; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
लातूर, 12 नोव्हेंबर, (हिं.स.)। आज दिनांक 12 नोव्हेंबर रोजी सर्व शेतकरी संघटना,मनसे,प्रहार,शिवसेना यांच्यामध्ये ऊसदराच्या मागण्यांसाठी बैठक संपन्न झाली आणि खालील मागण्यांसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर ला
निवेदन


लातूर, 12 नोव्हेंबर, (हिं.स.)। आज दिनांक 12 नोव्हेंबर रोजी सर्व शेतकरी संघटना,मनसे,प्रहार,शिवसेना यांच्यामध्ये ऊसदराच्या मागण्यांसाठी बैठक संपन्न झाली आणि खालील मागण्यांसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऊसाला 4200 रुपये अंतिम दर मिळाला पाहिजे,दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याचा ऊस चाऱ्यासाठी 4000 रुपये प्रतिटन प्रमाणे शासनाने खरेदी करावा ,सर्व कारखान्यांनी गेटकेनचा ऊस गाळप करण्याआधी कार्यक्षेत्रातील ऊस गाळपास प्राधान्य द्यावे,हार्वेस्टर मालकांनी शेतकऱ्याची आर्थिक पिळवणूक थांबवावी,पाण्या अभावी वाळत असलेल्या ऊसाला प्रोग्रामचा निकष न लावता तो ऊस प्राधान्याने गाळप करावा,शेतकऱ्यांनी ऊसाचे वजन बाहेरील वजन काट्यावर करून आणल्यास त्याची खात्री करून ते वजन ग्राह्य धरावे,ज्या कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या ऊसाचे बिल थकवले आहे अशा कारखान्यावर जप्तीची RRC कार्यवाही करून शेतकऱ्यांना व्याजासहित बिल अदा करावे,दुष्काळी परिस्थितीमुळे शासनाने शेतकऱ्यांच्या ऊसाला प्रतिटन 500 रुपये सानुग्रह अनुदान द्यावे या व इतर मागण्यांसाठी सर्व शेतकरी संघटना,मनसे,प्रहार,शिवसेना यांच्यात बैठक संपन्न होऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या बैठकीमध्ये एकमुखी 16 तारखेला मांजरा सहकारी साखर कारखान्यासमोर 'ढोल बजाव' आंदोलन करण्याचे ठरले.

यावेळी मनसे प्रदेश सरचिटणीस तथा मनसे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे, क्रांतिकारी शेतकरी संघटना प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे,क्रांतिकारी शेतकरी संघटना कोर कमिटी सदस्य राजेंद्र मोरे,भारतीय किसान युनियन प्रदेश प्रवक्ता राजकुमार सस्तापुरे,क्रांतिकारी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष अरुण दादा कुलकर्णी,क्रांतिकारी शेतकरी संघटना प्रवक्ता बालाजी शिंदे,जिल्हाप्रमुख प्रहार संघटना राजाभाऊ चौगुले मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ.नरसिंग भिकाने,शिवकुमार नागराळे,मनसे शेतकरी सेना प्रदेश उपाध्यक्ष भागवत शिंदे,मनसे जिल्हा उपाध्यक्ष रवी सूर्यवंशी,दगडूसाहेब पडिले,शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे भारतीय किसान युनियन जिल्हाध्यक्ष विवेक पाटील,युवा जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना रुपेश शंके,शेतकरी संघटना जिल्हा कार्याध्यक्ष बालाजी जाधव,शिवसेना तालुका सचिव महादेव काळे,श्रीराम चलवाड,दत्ता मुगळे,क्रांतिकारी शेतकरी संघटना युवा जिल्हाध्यक्ष प्रज्योत हुडे,अंकुश शिंदे,अजित घंटेवाड यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande