दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास आनंद होईल - खासदार ओमराजे निंबाळकर
असं काही वाटत नाही. मात्र, राजकारणात कधीही काही घडू शकतं - गोगावले मुंबई, 12 नोव्हेंबर (हिं.स.) - एकीकडे राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू असतानाच आता दोन्ही शिवसेना पक्षाच्या विलिनीकरणाचीही चर्चा पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर
ओमराजे निंबाळकर


- असं काही वाटत नाही. मात्र, राजकारणात कधीही काही घडू शकतं - गोगावले

मुंबई, 12 नोव्हेंबर (हिं.स.) - एकीकडे राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू असतानाच आता दोन्ही शिवसेना पक्षाच्या विलिनीकरणाचीही चर्चा पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास आनंद होईल, असे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले होते. आता, पुन्हा एकदा ओमराजेंनी दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास मलाच सर्वाधिक आनंद होईल असे म्हटले आहे. दुसरीकडे मंत्री भरत गोगावले यांनीही आत्ताचं भवितव्य आणि भविष्य जे काही दिसतंय त्यावरून आम्हाला असं काही वाटत नाही. मात्र, राजकारणात कधीही काही घडू शकतं, सकाळचा संध्याकाळी आणि संध्याकाळचा सकाळी कुठे. त्यामुळे राजकारणात काय घडेल सांगू शकत नाही.

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पुढे म्हटले की, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर माझ्यापेक्षा जास्त आनंदी माणूस दुसरा कोणीही नसेल. मात्र हा सर्व वरिष्ठ नेतृत्वाचा निर्णय आहे, माझ्यासारखा सामान्य माणूस फक्त इच्छा व्यक्त करु शकतो, भावना मांडू शकतो. मात्र याबाबाबत सर्वोतपरी निर्णय वरिष्ठच घेऊ शकतात. माझी भावना मी आधीच मांडली आहे. दोन्ही शिवसेना जर एकत्र आल्यातर माझ्याएवढा आनंदी कोणी नसेल,” असं ते म्हणाले.

ओमराजेंच्या या विधानामुळे ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या संभाव्य एकत्रीकरणाच्या चर्चेला पुन्हा एकदा राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे. मात्र, दोन्ही गटांच्या एकत्र येण्याबाबत प्रत्यक्षात काही राजकीय हालचाली होणार का? याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande