केईएम रुग्णालयात नवीन लिफ्ट महिनाभरात सुरु होणार
उपमहापौर संजय घाडी यांची रुग्णालयाला भेट * रुग्णालयात दोन नवीन लिफ्टचा प्रस्ताव लवकरच मंजूर करणार मुंबई, 12 नोव्हेंबर (हिं.स.) - परळ येथील केईएम रुग्णालयातील बंद असलेल्या लिफ्टसंदर्भात मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी गुरुवारी रुग्णालयाला भेट द
उपमहापौर संजय घाडी केईएम रुग्णालयाला भेट


* उपमहापौर संजय घाडी यांची रुग्णालयाला भेट

* रुग्णालयात दोन नवीन लिफ्टचा प्रस्ताव लवकरच मंजूर करणार

मुंबई, 12 नोव्हेंबर (हिं.स.) - परळ येथील केईएम रुग्णालयातील बंद असलेल्या लिफ्टसंदर्भात मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी गुरुवारी रुग्णालयाला भेट देऊन आढावा घेतला. यावेळी उपमहापौर घाडी यांनी केईएमचे अधिष्ठाता डॉ. हरीश पाठक यांच्याशी चर्चा केली. बंद पडलेल्या लिफ्टऐवजी नवीन लिफ्टचे काम सुरु असून महिनाभरात ती सुरु होईल, असे उपमहापौर घाडी म्हणाले.

उपमहापौर म्हणाले की, केईएम रुग्णालयातील ज्या विभागाची लिफ्ट बंद आहे ती ३९ वर्ष जुनी होती. त्या लिफ्टची कार्यक्षमता संपल्याने त्याच्या जागी दोन नवीन लिफ्ट बसवण्याचा प्रस्ताव केईएम रुग्णालयाने मुंबई महापालिकेने दिला आहे. महापौर आणि महापालिका आयुक्तांशी यासंदर्भात चर्चा करु आणि हा प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करु, असे उपमहापौर घाडी म्हणाले. बंद लिफ्टच्या जागी नवीन लिफ्टचे बांधकाम पूर्ण झाले असून ही लिफ्टचे येत्या ३० दिवसांत सुरु होईल, असा विश्वास उपमहापौर घाडी यांनी व्यक्त केला.

उपमहापौर घाडी यांनी गुरुवारी संध्याकाळी केईएम रुग्णालयाला भेट देऊन रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची विचारपूस केली. रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना होत असलेल्या गैरसोयींबाबत उपमहापौर घाडी यांनी माहिती घेतली. तत्पूर्वी बंद असलेल्या लिफ्ट संदर्भात उपमहापौर घाडी यांनी डॉ. हरीश पाठक व इतर डॉक्टरांशी चर्चा केली. त्यांनी रुग्णालयातील विविध वॉर्डमध्ये जाऊन रुग्णांशी संवाद साधला. गंभीर दुखापतीच्या रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी तूर्तास मुख्य इमारतीत दाखल करुन घेण्यात असल्याचे त्यांनी सांगितले.

छठ पुजेसंदर्भात बोलताना उपमहापौर घाडी म्हणाले की, मुंबई महापालिकेचे धोरण आम्ही सर्वांसमोर ठेवले असून ते सर्वांच्या सोयीचे आहे. आम्ही कुठल्याही जाती आणि धर्माच्या किंवा सणाच्या विरोधात नाहीत. यापूर्वी अनेक वर्षांपासून छठ पुजेसाठी महापालिका कृत्रिम तलावांची सुविधा उपलब्ध करुन देते, असे ते म्हणाले. रेल्वे स्टेशनवर होणाऱ्या उद्घोषणा या प्रवाशांना मार्गदर्शन करणाऱ्या असायला हव्यात, असे ते म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande