शॉर्ट सर्किटमुळे गुडाळ, निळपण येथे शेकडो एकर ऊस जळून खाक
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून नुकसानग्रस्त ऊस शेतीची पाहणी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे दिले निर्देश कोल्हापूर, १२ नोव्हेंबर (हिं.स.) : राधानगरी तालुक्यातील गुडाळ आणि भुदरगड तालुक्यातील निळपण येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आग
नुकसानग्रस्त ऊस शेतीची मंत्री आबिटकर यांनी केली पाहणी


पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून नुकसानग्रस्त ऊस शेतीची पाहणी

प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे दिले निर्देश

कोल्हापूर, १२ नोव्हेंबर (हिं.स.) : राधानगरी तालुक्यातील गुडाळ आणि भुदरगड तालुक्यातील निळपण येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत शेकडो एकर ऊस जळून खाक झाला. या आगीत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून, शेतकरी बांधवांवर संकट ओढवले आहे.

या पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी गुडाळ आणि निळपण येथील घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानग्रस्त ऊस शेतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या नुकसानीची माहिती घेतली.प्रशासनाने या घटनेचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना मंत्री आबिटकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच पंचनामे करताना शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा नाहक त्रास होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.संबंधित यंत्रणांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे करावेत आणि मदत प्रक्रियेला गती द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी नुकसानग्रस्त शेतकरी, स्थानिक पदाधिकारी, संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

--------------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande