लातूर - जि. प. शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सहा संचालकावर अपात्रतेची टांगती तलवार
लातूर, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। चाकूर जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या ६ संचालकांवर कर्जाची परतफेड थकविल्याचा ठपका ठेवण्यात आला असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील तरतुदींनुसार त्यांना संचालकपदावरून अपात्र ठरवून काढून का टाकू नये
शिक्षक पतसंस्था


लातूर, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। चाकूर जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या ६ संचालकांवर कर्जाची परतफेड थकविल्याचा ठपका ठेवण्यात आला असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील तरतुदींनुसार त्यांना संचालकपदावरून अपात्र ठरवून काढून का टाकू नये, अशी कारणे दाखवा नोटीस सहाय्यक निबंधकाने ३० ऑक्टोबर बजावली होती. याप्रकरणी १६ नोव्हेंबर रोजी सोमवारी दुपारी ३ वाजता सुनावणी ठेवण्यात आली आहे.

पतसंस्थेचे अध्यक्ष यांनी ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे सादर केलेल्या पत्रानुसार, संचालिका गोपिका बुड्ढे, संचालक चंद्रकांत भोजने, विरभद्र बावगे, बालाजी येळापुरे, प्रल्हाद इगे आणि शरद हुडगे यांनी पतसंस्थेकडून लाखों रुपयाचे कर्ज घेतले होते. कर्ज घेताना त्यांनी दरमहा मुद्दल व नियमानुसार व्याज भरण्याचे मान्य केले होते. मात्र, काही महिन्यांत मुद्दलाची परतफेड कमी केल्याचे तसेच परतफेड थकित असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande