नेपाळच्या गोरखामध्ये भूस्खलन; बूढी गंडकी नदीला पुराचा धोका तूर्तास टळला
काठमांडू, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। नेपाळमधील गोरखा जिल्ह्यातील धार्चे येथील ठाडो भर्यांगच्या जंगल परिसरात मोठी कोरडी दरड कोसळली आहे. दरड कोसळल्यानंतर काही दगड आणि मातीचा ढिगारा बूढी गंडकी नदीत पडला आहे. मात्र, तूर्तास नदीचा प्रवाह अडथळा निर्माण होण्य
NEPAL GORKHA LANDSLIDE RIVER


काठमांडू, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। नेपाळमधील गोरखा जिल्ह्यातील धार्चे येथील ठाडो भर्यांगच्या जंगल परिसरात मोठी कोरडी दरड कोसळली आहे. दरड कोसळल्यानंतर काही दगड आणि मातीचा ढिगारा बूढी गंडकी नदीत पडला आहे. मात्र, तूर्तास नदीचा प्रवाह अडथळा निर्माण होण्याचा कोणताही धोका नाही.

गावपालिकेचे अध्यक्ष लक्ष्मण गुरूंग यांनी सांगितले की, दरड कोसळलेले ठिकाण विस्तीर्ण आणि उतार असलेल्या डोंगराळ भागात आहे. त्यामुळे सध्या कोणताही धोका नाही. त्यांनी स्पष्ट केले की, दरड कोसळल्यामुळे बूढी गंडकी नदीचा प्रवाह अडवला जाण्याची शक्यता नाही.

अध्यक्ष गुरूंग म्हणाले, बूढी गंडकी नदीत अत्यल्प प्रमाणात दगड आणि मातीचा ढिगारा पडला आहे. सध्या नदीचा मार्ग बंद होण्याची परिस्थिती नाही. भविष्यात आणखी मातीचा ढिगारा नदीत आल्यास वेगळी बाब असेल. दरड कोसळलेले ठिकाण मोकळे आणि विस्तीर्ण उताराचे क्षेत्र असल्याने अशी कोणतीही शक्यता नाही.

गोरखा जिल्हा पोलीस कार्यालयानेही या ठिकाणी कोरडी दरड कोसळल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. गोरखाचे पोलीस अधीक्षक (एसपी) अनिल कुमार खड्का यांनी सांगितले की, धार्चे गावपालिकेतील ठाडो भर्यांग येथे धुळीसह मोठी दरड कोसळली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरड कोसळल्यानंतर उडालेली धूळ रस्त्यापर्यंत पोहोचली आहे. मात्र, बूढी गंडकी नदीचा प्रवाह अडवला जाण्याचा कोणताही धोका नाही. एसपी खड्का यांच्या माहितीनुसार, दरड कोसळलेल्या ठिकाणाची पाहणी करण्यासाठी पोलिसांचे एक पथक रवाना होत आहे. आज सकाळी सुमारे ९ वाजता अचानक ही कोरडी दरड कोसळली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande