अमेरिकेत विमानसेवेला अचानक ब्रेक; प्रवाशांची गैरसोय
वॉशिंग्टन, 14 नोव्हेंबर (हिं.स.)अमेरिकेतील हवाई वाहतूक नियंत्रण दळणवळण प्रणालीतील तांत्रिक बिघाडामुळे शुक्रवारी देशभरातील विमानसेवा जवळपास चार तास थांबवण्यात आली होती. फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने (एफएए) सुरक्षेच्या कारणास्तव देशभरातील विमानतळां
अमेरिकेत विमानसेवेला अचानक ब्रेक


वॉशिंग्टन, 14 नोव्हेंबर (हिं.स.)अमेरिकेतील हवाई वाहतूक नियंत्रण दळणवळण प्रणालीतील तांत्रिक बिघाडामुळे शुक्रवारी देशभरातील विमानसेवा जवळपास चार तास थांबवण्यात आली होती. फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने (एफएए) सुरक्षेच्या कारणास्तव देशभरातील विमानतळांवरील विमानसेवा थांबवण्याचे आदेश दिले होते. पण चार तासांनंतर ही विमानबंदी उठवण्यात आली.

एफएएच्या या आदेशादरम्यान, ८,००० हून अधिक विमानसेवा रद्द करण्यात आल्या. आणि त्यामुळे प्रवाशांवर परिणाम झाला. परिस्थिती सामान्य झाल्यावर शनिवारीही मोठ्या संख्येने विमानसेवा रद्द करण्यात आल्या.

ट्रम्प प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, अद्याप सायबर हल्ल्याची कोणतीही चिन्हे नाहीत आणि परिस्थिती ९/११ सारखी नाही. अमेरिकेचे गृह सुरक्षा सचिव मार्कवेन मुलीन यांनी सांगितले की, देशभरातील विमानतळांवरील विमानसेवा थांबवण्यामागे राष्ट्रीय सुरक्षेला कोणताही धोका असल्याचे संकेत नाहीत आणि हा दूरसंचार प्रणालीतील एक व्यत्यय होता. त्यांनी प्रवाशांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना संपूर्ण सुरक्षेचे आश्वासन दिले.

सर्व उड्डाणे थांबवण्याची ही घटना अमेरिकेच्या हवाई वाहतूक इतिहासातील एक दुर्मिळ घटना आहे. अमेरिकेच्या इतिहासात अशा तीन घटना घडल्या आहेत. ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर, संपूर्ण अमेरिकेतील हवाई वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली होती. अशीच एक घटना जानेवारी २०२३ मध्ये घडली होती. त्यावेळी, फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनच्या संगणक प्रणालीतील तांत्रिक बिघाडामुळे उड्डाणे थांबवण्यात आली होती.

प्रादेशिक हवाई वाहतूक नियंत्रण (ATC) केंद्रांवर संवादाशी संबंधित एक गंभीर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने (FAA) शुक्रवारी सर्व उड्डाणे थांबवली होती.

दरम्यान, एअर इंडियाने अमेरिकेत ये-जा करणाऱ्या प्रवाशांना अद्ययावत उड्डाण वेळांसाठी त्यांच्या फ्लाइटची स्थिती तपासण्याचा आणि त्यानुसार विमानतळावरील प्रवासाचे नियोजन करण्याचा सल्ला दिला आहे. एअर इंडियाने पुढे असेही म्हटले आहे की, त्यांचे पथक परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे आणि नवीन माहिती उपलब्ध होताच ती कळवली जाईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande