नांदूर मध्यमेश्वरचा अभयारण्यात पट्टेदार हंसाचे आगमन
नांदुर मधमेश्वर , 15 नोव्हेंबर (हिं.स.)। निसर्गाचे एक अनोखे विस्मय - ‘पट्टेदार हंस (बार-हेडेड गीझ) Bar-headed goose’ हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांना गवसणी घालायची अन अपार नीळ आकाश व लांबच लांब पाणथळ प्रदेशांवर अधिराज्य गाजवायचे, तर या अद्भूत
Arrival of striped swan in Nandur


Arrival of striped swan in Nandur


नांदुर मधमेश्वर , 15 नोव्हेंबर (हिं.स.)।

निसर्गाचे एक अनोखे विस्मय - ‘पट्टेदार हंस (बार-हेडेड गीझ) Bar-headed goose’ हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांना गवसणी घालायची अन अपार नीळ आकाश व लांबच लांब पाणथळ प्रदेशांवर अधिराज्य गाजवायचे, तर या अद्भूत पाखराचे रूप डोळ्यात साठवावेच लागेल! छायाचित्रात दिसणारे हे देखणे रूप म्हणजेच 'बार-हेडेड गूझ' (पट्टेदार हंस).पांढऱ्याशुभ्र मान आणि मस्तकावर काळ्या रंगाचे दोन रेखीव व वलयदार पट्टे असे कोरलेले आहेत, जणू निसर्गाने आपल्या कुंचल्याने स्वतःच्या हाताने एखादी नक्षीदार कलाकृती साकारली असावी. चेहऱ्यावरचा तो सतेज सोनेरी-पिवळसर रंग आणि चोचीचा ठसठशीत पिवळा पोत या पक्षाच्या राजसी सौंदर्यात आणखीच भर घालतो.हा केवळ एक पक्षी नाही, तर तो कणखरपणाचा, अफाट जिद्दीचा आणि अवघड वाटांवरून विनासायास प्रवास करणाऱ्या धैर्याचा एक जिवंत चमत्कार आहे. जेव्हा हा थवा आकाशात उंच भरारी घेतो, तेव्हा असे वाटते की सृष्टी आपल्या एखाद्या प्राचीन गूढ प्रवासाची गाथा लिहीत आहे.

चौकट

पृथ्वीवरील सर्वोच्च नैसर्गिक सीमा ओलांडून, गोठवणाऱ्या थंडीशी आणि विरळ ऑक्सिजनशी दोन हात करत हा हंस दरवर्षी एक नवा प्रवास करतो. जेव्हा हा पक्षी एखाद्या शांत सरोवराच्या वा पाणथळ जागेच्या काठावर डौन्माने मान उंचावून उभा असतो, तेव्हा त्याच्याकडे पाहून निसर्गाच्या या अगाध सौंदर्यापुढे मान आपोआप नतमस्तक होते!नांदूर मध्यमेश्वर अभयारण्यात बार-हेडेड गीझच्या आगमनाचा हा सुखद आणि ऐतिहासिक योग खरोखरच निसर्गप्रेमींसाठी आणि पक्षीअभ्यासकांसाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे.नाशिकमध्ये या वर्षी कुंभमेळा होतोय... आणि तसाच हा हिमालयातला ऋषी गोदातिरी पक्ष्यांच्या कुंभमेळ्यात दाखल झाला आहे!

- हिरालाल चौधरी ( वन परिक्षेत्र अधिकारी , नांदुरमध्यमेश्वर अभयारण्य )

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande