नाशिक मनपाच्या वतीने भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी
नाशिक, 15 नोव्हेंबर (हिं.स.)। - मनपाच्या वतीने क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन स्वागत कक्ष येथे क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस महापौर हिमगौर
नाशिक मनपाच्या वतीने भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी


नाशिक, 15 नोव्हेंबर (हिं.स.)।

- मनपाच्या वतीने क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन स्वागत कक्ष येथे क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस महापौर हिमगौरी आहेर-आडके व उपमहापौर विलास शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास उपायुक्त नितीन नेर, जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे, श्रीकांत भोई, आकाश शिनगाण, रमेश पागे, भाऊसाहेब पवार, अशोक कोरडे,मनोज गायधनी,सुनील भाबड,गणेश देवरे आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande