कुंभमेळ्याचे बनावट इंस्टाग्राम अकाउंट बनवून फसवणूकीचा प्रयत्न सायबर पेट्रोलिंगमध्ये उघड, गुन्हा दाखल
नाशिक, 15 नोव्हेंबर (हिं.स.)। - नाशिक मध्ये होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कार्यालयाचे अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट असल्याचे दाखवून लोकांना फसविण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सायबर पोलिसांच्या पेट्रोलिंग मध्ये समोर आली आहे याबाबत अज्ञात
कुंभमेळ्याचे बनावट इंस्टाग्राम अकाउंट बनवून फसवणूकीचा प्रयत्न सायबर पेट्रोलिंगमध्ये उघड, गुन्हा दाखल


नाशिक, 15 नोव्हेंबर (हिं.स.)।

- नाशिक मध्ये होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कार्यालयाचे अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट असल्याचे दाखवून लोकांना फसविण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सायबर पोलिसांच्या पेट्रोलिंग मध्ये समोर आली आहे याबाबत अज्ञात व्यक्ती विरोधात सायबर पोलीस ठाणे मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की नाशिक मध्ये कुंभमेळा सुरू झालेला आहे. राष्ट्रपती द्रोपदी मुर्म यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर आता पुढील पर्वणीची तयारी सुरू झाली आहे. असे असताना यापूर्वी सिंहस्थ कुंभमेळाचे कॉन्ट्रॅक्ट देण्याच्या नावाने फसवणूक करण्याची घटना घडली होती त्यानंतर प्राधिकरणाचे प्रमुख अधिकारी असलेले अध्यक्ष प्रवीण गेडाम यांच्या नावाने बनवत सही करून आदेश देण्याची घटना देखील समोर आली होती या सर्व घटना होत असताना आता पुन्हा एकदा कुंभमेळ्याच्या नावावरती फसवणूक करण्याच्या हालचाली होत असल्याची बाब समोर आली आहे.

याबाबत सायबर पोलीस ठाण्याकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आलेल्या माहितीनुसार नाशिक शहर सायबर पोलीस स्टेशनच्या सायबर पेट्रोलिंग पथकामार्फत सोशल मीडियावरील संशयास्पद हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. रविवार दिनांक १५ नोव्हेंबर रोजी सायबर पेट्रोलिंग करत असताना, इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर official.kumbhnagari_nashik या नावाने एक अकाउंट कार्यरत असल्याचे समू आले. या अकाउंटची पाहणी केली असता, त्यावरून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कार्यक्रमांबाबत रिल्स व पोस्ट प्रसारित केल्या जात होत्या. हे अकाउंट पाहताक्षणी 'सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण, नाशिक' या शासकीय कार्यालयाचे अधिकृत पेज असल्याचे भासवून नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचे निष्पन्न झाल्याने या अज्ञात इंस्टाग्राम अकाउंट धारकाविरुद्ध सायबर पोलीस स्टेशन मध्ये गुरनं 88/2026 भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २०४ सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम (IT Act) कलम ६६ (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

नागरिकांना आवाहन

याबाबत नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यानी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आगामी सिंहस्थ कुंभमेळा किंवा इतर कोणत्याही शासकीय योजना व कार्यक्रमांच्या माहितीसाठी केवळ शासनाच्या अधिकृत संकेतस्थळांवर व प्रमाणित सोशल मोडिया हँडल्सवरच विश्वास ठेवावा. कोणत्याही बनावट किंवा संशयास्पद सोशल मीडिया अकाउंट्सची माहिती आढळल्यास तात्काळ नाशिक शहर सायबर पोलीस स्टेशन /सीपी व्हॉट्सअप क्रमांक 9923323311/112 शी संपर्क साधावा.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande