
नाशिक, 15 नोव्हेंबर (हिं.स.)।
- प्लंबिंग क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान, आधुनिक मटेरियल आणि साहित्य एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी इंडियन प्लंबिंग असोसिएशन (IPA) नाशिक चॅप्टरच्या वतीने लोकनेते व्ही. एन. नाईक एज्युकेशन सोसायटीच्या इंजिनिअरिंग कॉलेज येथे प्लंबिंग साहित्याच्या भव्य एक दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते . अशा प्रकारचे प्रदर्शन पहिल्यांदाच नाशिकमध्ये संपन्न झाले.या प्रदर्शनाचा शुभारंभ व्ही. एन. नाईक इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. कैलास चंद्रात्रे, इंडियन प्लंबिंग असोसिएशन नाशिक चॅप्टरचे अध्यक्ष विक्रम खैरनार आणि इंडियन प्लंबिंग असोसिएशनचे नॅशनल डायरेक्टर मिलिंद शेटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला.पायाभूत सुविधा उभारणी आणि बांधकाम क्षेत्रात प्लंबिंग चे अनन्यसाधारण महत्व आहे.जसेजसे तंत्रज्ञान सुधारत आहे ,त्याचप्रमाणे त्याचा परिणाम प्लम्बिंग च्या तंत्रावरही होत आहे.पाण्याचे तसेच सांडपाण्याचे योग्य नियोजन करणे ही आधुनिक प्लंबिंगमधील महत्वाची बाब आहे.या प्रदर्शनाच्या निमित्ताने हीच बाब पुन्हा अधोरेखित करण्यात आली आहे.या प्रदर्शनात अभियांत्रिकीचे विद्यार्थी, व्यावसायिक ,इंजिनिअर्स, आर्किटेक्ट्स ,कन्सल्टंट्स, मॅन्युफॅक्चरर्स आणि ट्रेडर्सनी सहभाग घेतला.
प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी इंडियन प्लंबिंग असोसिएशन, नाशिक चॅप्टरचे उपाध्यक्ष जयंत भिंगे ,सचिव अनिल अरगडे , प्रकल्प संयोजक चिन्मय देशपांडे, सुनील कुटे, सोमनाथ क्षीरसागर, घनश्याम बडगुजर, सुनील दिघे यांचे सहकार्य लाभले.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI