छटपूजेनिमित गोदाकाठी कुंभ, मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थिती
नाशिक, 15 नोव्हेंबर (हिं.स.)। उत्तर भारतीय बांधवांचा अत्यंत महत्त्वाचा उत्सव मानला जाणाच्या छटपूजेनिमित्त रविवारी (दि.15 ) सायंकाळी गोदाघाटावर मावळत्या सूर्याला अर्घ्य देण्यात आले. यावेळी व्रतस्थ महिला व पुरुषांनी नदीपात्रात कमरेपर्यंत पाण्यात उभ
छटपूजेनिमित गोदाकाठी कुंभ, मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थिती


नाशिक, 15 नोव्हेंबर (हिं.स.)।

उत्तर भारतीय बांधवांचा अत्यंत महत्त्वाचा उत्सव मानला जाणाच्या छटपूजेनिमित्त रविवारी (दि.15 ) सायंकाळी गोदाघाटावर मावळत्या सूर्याला अर्घ्य देण्यात आले. यावेळी व्रतस्थ महिला व पुरुषांनी नदीपात्रात कमरेपर्यंत पाण्यात उभे राहून मनोभावे छट मातेचे पूजन केले. भाविकांनी सोबत आणलेल्या पूजा सामग्रीने पूजाअर्चा व आरती केल्यानंतर भाविक आपल्या घरी जाण्यासाठी माघारी फिरत होते. तर व्रतस्थ भाविक रात्रभर नदीपात्रात उभे राहून उद्या (दि.16 ) सकाळी उगवत्या सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर व्रताची विधिवत सांगता केली जाणार आहे.

दिवाळी सण साजरा केल्यानंतर कार्तिक चतुर्थीच्या दिवशी उत्तर भारतीय बांधवांच्या छटपूजेस प्रारंभ होतो. पहिल्या दिवशी नहाय-खाय, दुसऱ्या दिवशी खरना, तिसऱ्या दिवशी सूर्यास्त समयी सूर्याला पहिले अर्घ्य देऊन चौथ्या दिवशी पहाटे उगवत्या सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर या व्रताची सांगता होत असते. उत्तर भारतीय बांधवांच्या घरोघरी 13 रोजी नहाय-खाय अर्थात मन व शरीराची शुद्धी करण्यात येऊन छटपूजेस प्रारंभ झाला. सात्विक आहार घेऊन या उत्सवाची सुरुवात होत असते. दुसऱ्या दिवशी

खरना म्हणजे व्रतस्थ महिला व पुरुषांनी निर्जला उपवास करीत मनोभावे छटमातेचे पूजन केले. कार्तिक शुद्ध षष्ठी अर्थात रविवारी 15 नोव्हेंबर रोजी सूर्यास्त होण्याच्या दोन तास अगोदर गोदापात्रात उभे राहून मावळत्या सूर्याची पूजा करण्यात आली. सूर्य अस्ताला गेल्यावर अर्घ्य देऊन याठिकाणी मांडण्यात आलेली पूजासामग्रीची मनोभावे पूजन करून आरती करण्यात आली. यावेळी नदीपात्रात उसाचे तोरण उभारून जवळच टोपली व सूप यामध्ये विविध प्रकारचे फळं ठेवून व धूप दीप लावून मनोभावे पूजन करण्यात आले. आरती करून झाल्यावर अनेक भाविकांनी घरची वाट धरली. तर जे व्रतस्थ महिला-पुरुष होते ते रात्रभर नदीपात्रात कमरेपर्यंत पाण्यात उभे होते.

दरम्यान, रविवारी दुपारी चार वाजेनंतर उत्तर भारतीय बांधवांची गर्दी गोदाघाटावर वाढण्यास सुरुवात झाली. पोलिसांनी रामकुंडाच्या दिशेने येणारे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. रामकुंडासह लक्ष्मणकुंड, गांधी तलाव, धनुष कुंड, सीता कुंड, दुतोंड्या मारुती जवळील नदीपात्रापासून गाडगे महाराज पुलापर्यंत उत्तर भारतीय बांधवांनी छटपूजेसाठी गर्दी केली होती.

शिवतांडव, राधा-कृष्ण आणि माँ कालीचे भव्य देखावे ठरणार आकर्षणाचे केंद्र

यंदाच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये धार्मिक सादरीकरणांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. यामध्ये भगवान श्री राधा-कृष्ण यांचा मनमोहक देखावा, भगवान शंकर व माता पार्वती यांचा दिव्य देखावा, भगवान शंकरांच्या तांडवनृत्याचे विशेष सादरीकरण तसेच माँ कालीच्या भव्य स्वरूपाचा देखावा हे भाविकांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र असणार आहेत.

तात्पुरत्या वस्त्रांतरगृहाची व्यवस्था

छटपूजेनिमित्त जिल्ह्यासह विविध भागातून उत्तर भारतीय महिला तसेच पुरुष गोदाकाठी छटपूजा करण्यासाठी हजेरी लावतात. मोठ्या प्रमाणात महिला येत असल्याने त्यांच्यासाठी यावर्षी उत्तर भारतीय बांधवांच्या संस्थांतर्फे तात्पुरत्या वस्त्रांतरगृहाची व्यवस्था करण्यात आल्याने

यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद , आमदार राहुल ढिकले , सौ. सीमा ताई हिरे , सौ. देवयानी फरांदे , उपमहापौर विलास शिंदे के. सी. पांडेय , मनीष मिश्रा, बालासाहेब सानप, गणेश गीते जी आणि पंचवटीचे पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांची उपस्थिती प्रस्तावित आहे.

बहुद्देशीय संस्थेच्या वतीने भोजपुरी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्च्या अध्यक्षस्थानी गोविंदा झा होते. यावेळी महंत भक्तीचरणदास महाराज, गणराज सेवाभावी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे उमापती ओझा, हिरालाल परदेशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande