जळगावात चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन तरुणाची आत्महत्या
जळगाव, 17 नोव्हेंबर (हिं.स.) | जळगाव शहरातील गजबजलेल्या गोलाणी मार्केटमध्ये मंगळवारी दुपारी धक्कादायक घटना घडली. मार्केटच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन एका अंदाजे ४२ वर्षीय तरुणाने जीवन संपवलं आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून मृत तरुणाच
जळगावात चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन तरुणाची आत्महत्या


जळगाव, 17 नोव्हेंबर (हिं.स.) | जळगाव शहरातील गजबजलेल्या गोलाणी मार्केटमध्ये मंगळवारी दुपारी धक्कादायक घटना घडली. मार्केटच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन एका अंदाजे ४२ वर्षीय तरुणाने जीवन संपवलं आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून मृत तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी दोन वाजेच्या सुमारास गोलाणी मार्केटमध्ये नेहमीप्रमाणे नागरिक आणि व्यापाऱ्यांची वर्दळ सुरू होती. याचवेळी एका तरुणाचा चौथ्या मजल्यावरून खाली पडल्याचा प्रकार घडला. खाली पडल्याने तो गंभीर जखमी झाला. घटनेनंतर मार्केटमधील व्यापारी आणि नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच जळगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी प्राथमिक पंचनामा करून जखमी तरुणाला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत तरुणाची ओळख अद्याप समोर आलेली नाही. त्याचे नाव आणि पत्ता शोधण्याचे काम जळगाव शहर पोलिसांकडून सुरू आहे. तसेच घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून पुढील तपास सुरू आहे. जळगाव शहर पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल सतीश पाटील, वीरेंद्र शिंदे, नंदू पाटील आणि राहुल पांचाळ यांनी घटनास्थळी पाहणी केली. या घटनेबाबत अधिक माहिती पोलिसांच्या तपासानंतर समोर येण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande