चिपळूणमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
रत्नागिरी, १७ नोव्हेंबर (हिं.स.) : चिपळूण तालुक्यातील वालोपे रेल्वे स्टेशन नाका परिसरात मंगळवारी पहाटे एका तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. एका टपरीच्या मागे या तरुणाचा मृतदेह आढळून आला. डोक्यात जांभा दगड घालून त्याची हत्या करण्यात
चिपळूणमध्ये तरुणाची निर्घृण हत्या


रत्नागिरी, १७ नोव्हेंबर (हिं.स.) : चिपळूण तालुक्यातील वालोपे रेल्वे स्टेशन नाका परिसरात मंगळवारी पहाटे एका तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. एका टपरीच्या मागे या तरुणाचा मृतदेह आढळून आला. डोक्यात जांभा दगड घालून त्याची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

नवनाथ कांबळे असे मृत तरुणाचे नाव असून, तो मूळचा सांगली येथील रहिवासी होता. वालोपे येथे रेल्वे कर्मचारी असलेल्या आपल्या नातेवाईकाकडे तो वास्तव्यास होता. लोटे येथील एका खासगी कंपनीत तो नोकरी करत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास नवनाथ कांबळे हा कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. मात्र, मंगळवारी पहाटे वालोपे रेल्वे स्टेशन नाका परिसरातील एका टपरीच्या मागे त्याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यात जांभा दगड घालून हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हत्येमागील नेमके कारण काय, तसेच या गुन्ह्यात कोणाचा सहभाग आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. परिसरातील परिस्थिती आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपासाची चक्रे फिरविण्यात येत आहेत.

दरम्यान, कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या हत्येचा छडा लावण्याचे आव्हान चिपळूण पोलिसांसमोर आहे.

------------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande