
रायगड, 17 नोव्हेंबर, (हिं.स.)। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड येथील वापरून निर्लेखित करण्यात आलेल्या यंत्रसामग्री व अन्य साहित्याची विक्री निविदा प्रक्रियेद्वारे करण्यात येणार आहे. यासाठी केवळ जीएसटी नोंदणीधारक खरेदीदारांकडून सिलबंद निविदा मागविण्यात आल्या आहेत.
सदर साहित्याची विक्री आहे त्या स्थितीत करण्यात येणार असून, इच्छुक खरेदीदारांना १८ ते २७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत सुटीचे दिवस वगळून सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत संस्थेच्या संबंधित विभागात साहित्याची पाहणी करता येणार आहे. निविदेचा विहित नमुना संस्थेच्या कार्यालयातून ३०० रुपये ना-परतावा शुल्क भरून खरेदी करता येईल.
निविदेसोबत ५ हजार रुपयांची अनामत रक्कम प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड यांच्या नावे डिमांड ड्राफ्टद्वारे जमा करणे आवश्यक आहे. प्रपत्र अ व प्रपत्र ब यांसाठी स्वतंत्र लिफाफे तयार करून आवश्यक कागदपत्रांसह निविदा ३० नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत कार्यालयात जमा कराव्यात.
प्राप्त सिलबंद निविदा २ डिसेंबर २०२६ रोजी दुपारी २.३० वाजता संस्थेच्या प्राचार्यांच्या कक्षात उघडण्यात येणार आहेत. संपूर्ण निविदा प्रक्रिया रद्द करणे किंवा त्यात फेरबदल करण्याचा अधिकार प्राचार्यांनी राखून ठेवला आहे. अशी माहिती संस्थेचे प्राचार्य एम. बी. गवई यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)