
नाशिक, 18 नोव्हेंबर (हिं.स.)।
- पैशांचा तगादा लावून तुझ्यावर खोटी केस करू, अशी धमकी देऊन एका इसमाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आरोपी विजू ठक्कर, भावसार, पिंटू हिरामण जाधव, आदेश भावसार व इतर भिशीचे मेंबर यांनी भिशीच्या पैशावरून फिर्यादी मालन अशोक शिंदे (रा. भराडवाडी, पेठ रोड, फुलेनगर) यांचे पती अशोक खंडू शिंदे यांना तगादा लावून तुझ्यावर खोटी केस करू,' अशी धमकी दिली. तेव्हा पैसे भरण्यासाठीफिर्यादीच्या पतीने आरोपी भावसार (रा. मालेगाव) याच्याकडे म्हशींची विक्री केली. एकूण ४० लाख रुपये मागितले असता त्याने पैसे दिले नाहीत. म्हणून अशोक शिंदे यांनी दि. २८ ऑक्टोबर रोजी गुलाबबाग, पेठ फाटा येथे विषारी औषध सेवन केले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात औषधोपचार सुरू असताना दि. ३ नोव्हेंबर रोजी डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. फिर्यादीचे पती अशोक शिंदे यांना चौघा जणांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पावसे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI