माजी खासदार इम्तियाज जलील यांना जामीन मंजूर
नाशिक, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। - निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांना नाशिक न्यायालयाने पन्नास हजार रुपयांच्या जामिनावरती सुटका केली आहे. यावेळी न्यायालयात जलील यांच्या वकिलांनी सर्व ते सहकार्य तपासात करत असल्याच
इम्तियाज जलील


नाशिक, 19 नोव्हेंबर (हिं.स.)।

- निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांना नाशिक न्यायालयाने पन्नास हजार रुपयांच्या जामिनावरती सुटका केली आहे. यावेळी न्यायालयात जलील यांच्या वकिलांनी सर्व ते सहकार्य तपासात करत असल्याचे सांगितले.

बहुराष्ट्रीय कंपनी टीसीएस मध्ये महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक छळ व धार्मिक भावना दुखावले आणि धर्मांतरणाचा प्रयत्न करणे या सगळ्या प्रकरणातील संशयित आरोपी निदाखान व इतर सहकाऱ्यांवरती मुंबई नाका पोलीस ठाणे आणि नाशिक रोड पोलीस ठाणे मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी म्हणून गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली एस आय टी ची स्थापना करण्यात आली होती या एसआयटीने तपास करत असताना फरार असलेली निदा खान हिला संभाजीनगर मधून अटक केली होती. या प्रकरणांमध्ये संभाजीनगर मध्ये एमआयएमचे नगरसेवक मशीन पटेल यांच्यासह इम्तियाज जलील यांनी मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.

या सर्व प्रकरणांमध्ये नाशिक जिल्हा न्यायालय मध्ये पोलिसांनी चार्जशिट दाखल केले असून न्यायालयाने एम एम चे माजी खासदार इम्तियाज जलील यांना या प्रकरणांमध्ये हजर राहण्यास सांगितले होते सह आरोपी असलेले माजी खासदार जलील आज गुरुवारी 19 नोव्हेंबर रोजी नाशिक न्यायालयात दाखल झाले यावेळी न्यायालयात सरकारी पक्ष आणि सह आरोपी असलेले जलील यांच्या वकिलांमध्ये सुमारे अर्धा तास अर्ग्युमेंट झाल्यानंतर जिल्हा न्यायालयाने जलील यांना 50 हजार रुपयांच्या जामीनावर सुटका केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande