भुसावळ विभागातील ९ गाड्यांचे मार्ग बदलले
जळगाव, 19 नोव्हेंबर, (हिं.स.) रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. उत्तर मध्य रेल्वेच्या झाशी विभागातील वीरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शन स्थानकाच्या फलाट क्रमांक १ वर बॅलेस्टलेस रेल्वेमार्ग उभारणीचे काम करण्यात येणार आहे. या कामामुळे भ
भुसावळ विभागातील ९ गाड्यांचे मार्ग बदलले


जळगाव, 19 नोव्हेंबर, (हिं.स.) रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. उत्तर मध्य रेल्वेच्या झाशी विभागातील वीरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शन स्थानकाच्या फलाट क्रमांक १ वर बॅलेस्टलेस रेल्वेमार्ग उभारणीचे काम करण्यात येणार आहे. या कामामुळे भुसावळ विभागाशी संबंधित ९ रेल्वेगाड्यांच्या मार्गात तात्पुरता बदल करण्यात आला आहे. विविध कालावधीत या गाड्या पर्यायी मार्गाने धावणार असून प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी गाडीचा मार्ग आणि वेळापत्रक तपासून घ्यावे.गाडी क्रमांक १२१७४ माँ बेल्हा देवी धाम प्रतापगड–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस २४ नोव्हेंबर ते २९ डिसेंबरदरम्यान, तर १२१०८ सीतापूर–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस २२ नोव्हेंबर ते २७ डिसेंबरदरम्यान कानपूर, हमीरपूर रोड, जबलपूर आणि इटारसीमार्गे धावणार आहे.

तसेच २२५८३ छपरा–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस २४ नोव्हेंबर ते २२ डिसेंबरदरम्यान गोविंदपुरी, कानपूर, हमीरपूर रोड, जबलपूर आणि इटारसीमार्गे वळविण्यात आली आहे. ११४०७ पुणे–लखनऊ एक्सप्रेस २४ नोव्हेंबर ते २२ डिसेंबरदरम्यान निर्धारित मार्गाऐवजी इटारसी, जबलपूर, हमीरपूर रोड आणि कानपूरमार्गे लखनऊला पोहोचणार आहे. तर १२४०६ हजरत निजामुद्दीन–भुसावळ एक्सप्रेस २० नोव्हेंबर ते २७ डिसेंबरदरम्यान मथुरा, बयाना, सोगरिया आणि बीना मार्गे भुसावळला पोहोचणार आहे. १४३१४ बरेली–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस २१ नोव्हेंबर ते २६ डिसेंबरदरम्यान ग्वाल्हेर, गुना आणि बीना मार्गे धावणार आहे. २२१२९ लोकमान्य टिळक टर्मिनस–अयोध्या कॅन्ट एक्सप्रेस २१ नोव्हेंबर ते २७ डिसेंबरदरम्यान ललितपूर, खजुराहो आणि महोबा मार्गे धावणार आहे. याच कालावधीत २२१३० अयोध्या कॅन्ट–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस महोबा, खजुराहो आणि ललितपूरमार्गे धावेल. दरम्यान, १२९४४ कानपूर–वलसाड एक्सप्रेस २० नोव्हेंबर ते २५ डिसेंबरदरम्यान कानपूर, प्रयागराज, माणिकपूर, जबलपूर आणि इटारसीमार्गे वलसाडला पोहोचणार आहे. झाशी स्थानकावरील कामामुळे हे तात्पुरते मार्गबदल करण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी रेल्वेचे अद्ययावत वेळापत्रक आणि मार्ग तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande