अंबड एमआयडीसीत अज्ञात ट्रकची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू
नाशिक, 2 नोव्हेंबर (हिं.स.) : अंबड एमआयडीसी परिसरात अज्ञात ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. विठ्ठल ज्ञानेश्वर सानप (वय २४, रा. वृंदावननगर, कामठवाडे, अंबड) असे मृत तरुणाचे नाव आहे. अपघातानंतर ट्रकचा
अंबड एमआयडीसीत अज्ञात ट्रकची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू


नाशिक, 2 नोव्हेंबर (हिं.स.) : अंबड एमआयडीसी परिसरात अज्ञात ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. विठ्ठल ज्ञानेश्वर सानप (वय २४, रा. वृंदावननगर, कामठवाडे, अंबड) असे मृत तरुणाचे नाव आहे. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला असून, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ तारखेला मध्यरात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास विठ्ठल सानप हे दुचाकीने (क्र. एमएच १५ जेएफ ४१८१) अंबड एमआयडीसी परिसरातून घरी जात होते. अंबड येथील पॉवर हाऊसजवळ एक्स्लो पॉइंटकडून गरवारेच्या दिशेने जात असताना एका अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या भीषण धडकेत विठ्ठल यांच्या डोक्याला तसेच दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघात घडल्यानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढला.

याप्रकरणी मृत विठ्ठल यांचे भाऊ उमेश ज्ञानेश्वर सानप यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड करीत आहेत.

---------------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande