रत्नागिरी : घरफोडी प्रकरणी 4 वर्षांनी गुन्हा दाखल
रत्नागिरी, 02 नोव्हेंबर (हिं.स.) । वेरवली खुर्द (ता. लांजा) येथील कातळवाडी परिसरात चार वर्षांपूर्वी झालेल्या घरफोडीप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात चोरट्याने घराची कौले काढून घरात प्रवेश करत सुमारे ७ लाख ८७ हजार ८७७ र
रत्नागिरी : घरफोडी प्रकरणी 4 वर्षांनी गुन्हा दाखल


रत्नागिरी, 02 नोव्हेंबर (हिं.स.) । वेरवली खुर्द (ता. लांजा) येथील कातळवाडी परिसरात चार वर्षांपूर्वी झालेल्या घरफोडीप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात चोरट्याने घराची कौले काढून घरात प्रवेश करत सुमारे ७ लाख ८७ हजार ८७७ रुपये किमतीचे सोन्याचे व हिऱ्याचे दागिने चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिजित हेमंत लाड (वय ३९, सध्या रा. वीर सावरकर मार्ग, प्रभादेवी, मुंबई; मूळ रा. वेरवली खुर्द, कातळवाडी, ता. लांजा) यांच्या आई नम्रता हेमंत लाड (वय ६३) वेरवली खुर्द येथील आपल्या घरी वास्तव्यास होत्या. २ जून २०२२ रोजी रात्री ११ ते ३ जून २०२२ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान त्या घरात झोपलेल्या असताना अज्ञात चोरट्याने घराची कौले काढून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील सोन्याच्या दोन कानातील रिंगा, दोन पाटल्या, चार बांगड्या, गोफमाळ आणि हिऱ्याची अंगठी असा एकूण ७ लाख ८७ हजार ८७७ रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.या प्रकरणी अभिजित लाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande