नाशिक - फळ विक्रेत्याला खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी
नाशिक, 20 नोव्हेंबर, (हिं.स.)। फळ विक्रीचा गाडा सुरू ठेवण्यासाठी फळ विक्रेत्याकडून ३५ हजार रुपयांची खंडणी वसूल करून व त्याला पुन्हा चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गजू घोडके दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प
नाशिक - फळ विक्रेत्याला खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी


नाशिक, 20 नोव्हेंबर, (हिं.स.)। फळ विक्रीचा गाडा सुरू ठेवण्यासाठी फळ विक्रेत्याकडून ३५ हजार रुपयांची खंडणी वसूल करून व त्याला पुन्हा चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गजू घोडके दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी विजय बाळू माने (रा. गायत्री माता मंदिराजवळ, तेलंगवाडी, पंचवटी) हे फळ विक्रीचा व्यवसाय करतात. आरोपी गजू घोडके व त्याचा आदी नावाचा साथीदार यांनी संगनमत करून घातक हत्याराचा धाक दाखवून व जिवे ठार मारण्याची धमकी देऊन फळ विक्रीचा गाडा सुरू ठेवण्यासाठी माने यांच्याकडून ३५ हजार रुपये खंडणीस्वरूपात वसूल केले होते. त्यानंतर माने यांनी घोडके याला हप्ता देण्यास टाळाटाळ केली असता गजू घोडके व त्याचा साथीदार आदी हे दोघे माने यांच्या फळ विक्रीच्या गाड्यावर आले व फिर्यादीला चाकूचा धाक दाखवून त्यांच्या मानेवर चाकूने वार करून त्यांना जखमी केले फिर्यादीच्या खिशातील गल्ल्यातील ८ हजार ९०० रु जबरदस्तीने चोरी करून फिर्यादीला जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. गजू घोडके व त्याच्या साथीदाराने फिर्यादी माने यांच्या मेहेरधाम बस स्टॉप येथे असलेल्या दुकानावर जाऊन वेळोवेळी खंडणी वसूल करून पुन्हा पुन्हा खंडणीची मागणी करून धमकी दिली. हा प्रकार फेब्रुवारी ते ८ नोव्हेंबरदरम्यान घडला. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गजू घोडके व त्याच्या साथीदाराविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande