
नवी दिल्ली, २१ नोव्हेंबर (हिं.स.) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) महिला निवड समितीने इंग्लंडच्या १९ वर्षांखालील महिला संघाविरुद्ध होणाऱ्या आगामी पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय १९ वर्षांखालील महिला संघाची घोषणा केली आहे. ही मालिका वडोदरा आणि सुरत येथे खेळवली जाईल. जानेवारी २०२७ मध्ये होणाऱ्या आयसीसी १९ वर्षांखालील महिला टी-२० विश्वचषकाच्या तयारीसाठी ही मालिका महत्त्वपूर्ण ठरेल.
भाविका अहिरेची संघाची कर्णधार म्हणून, तर अनादी तागडे उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. भाविकासोबत श्रेया एस. चव्हाणची यष्टीरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.
भारतीय 19 वर्षाखालील महिला संघ:
भाविका अहिरे (कर्णधार आणि यष्टिरक्षक), इरा जाधव, निधी महतो, पूर्वा सिवाच, मेहेक नरवसे, मैत्री मणियार, ईश्वरी अवसरे, दिया यादव, श्रेया एस. चव्हाण (यष्टीरक्षक), समायरा राघव, अना कुमार, पराकादी, कुमार उमा, श्रेया. तागडे (उपकर्णधार), पलक सिंग.
इंग्लंड अंडर-19 महिला संघाचा भारत दौरा: वेळापत्रक
पहिला टी20 सामना 26 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता वडोदरा येथे खेळवला जाईल. दुसरा सामना 28 नोव्हेंबर रोजी दुपारी 1:00 वाजता वडोदरा येथे होणार आहे. मालिकेतील तिसरा सामना १ डिसेंबर रोजी सायंकाळी ६:०० वाजता सुरतमध्ये, चौथा सामना ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६:०० वाजता सुरतमध्ये आणि पाचवा व अंतिम सामना ६ डिसेंबर रोजी दुपारी १:०० वाजता सुरतमध्ये खेळला जाईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे