बॉलिवूडमध्ये अमृताच्या नऊवारी साडीची चर्चा
मुंबई, 23 नोव्हेंबर (हिं.स.)।सध्या बॉलिवूडमध्ये सध्या मराठमोळ्या साड्यांची आणि नऊवारीची चांगलीच चर्चा रंगताना बघायला मिळत असून अभिनेत्री अमृता खानविलकरचा ब्रॅंड “अमुल्य” हा बॉलिवूड मधल्या बड्या कलाकारांचं लक्ष वेधून घेताना दिसतोय. माधुरी दीक्षित अस
बॉलिवूडमध्ये अमृताच्या नऊवारी साडीची चर्चा


मुंबई, 23 नोव्हेंबर (हिं.स.)।सध्या बॉलिवूडमध्ये सध्या मराठमोळ्या साड्यांची आणि नऊवारीची चांगलीच चर्चा रंगताना बघायला मिळत असून अभिनेत्री अमृता खानविलकरचा ब्रॅंड “अमुल्य” हा बॉलिवूड मधल्या बड्या कलाकारांचं लक्ष वेधून घेताना दिसतोय. माधुरी दीक्षित असो वा श्रद्धा कपूर, बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्री सध्या मराठमोळ्या नऊवारीचा साज अभिमानाने मिरवताना दिसतात आणि हा मराठमोळा साज आपल्या मराठी अभिनेत्रीच्या ब्रँडचा असून मराठी सिने इंडस्ट्रीसाठी आणि मराठी व्यवसायिकासाठी नक्कीच अभिमानास्पद आहे. या मराठमोळ्या साजाला बॉलिवूडमध्ये नवी ओळख मिळवून देण्यात अभिनेत्री अमृता खानविलकरचा मोलाचा वाटा आहे.

अमृताने वाढदिवसाच औचित्य साधून खास पोस्ट सोशल मीडियावर शेयर केली असून या पोस्टने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. आगामी बहुचर्चित श्रद्धा कपूरच्या “ ईठा “ चित्रपटासाठी अमृताचा साडी ब्रँडची निवड झाली आहे. “अमुल्य बाय अमृता” हा अमृताचा ब्रँड ईठा या सिनेमासाठी ऑफिशल साडी ब्रॅंड ठरला आहे. या बद्दल बोलताना अमृता सांगते “ वर्षभराच्या आत आम्ही हा ब्रॅंड आपली मराठमोळी पैठणी जगभरात पोहचवत आहोत याचा मला खूप अभिमान आहे.सोबतीला आता बॉलिवूडमध्ये धकधक गर्ल माधुरी दिक्षीत मॅडम, ईठा फेम श्रद्धा कपूर याना देखील अमुल्यच्या मराठमोळ्या साजत बघताना खूप छान वाटतंय. महाराष्ट्राची शान असलेली पैठणी बॉलिवूड मधल्या कलाकारांना भुरळ घालतेय. माझ्या अभिनयाच्या प्रवासात, करिअरच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर, माझ्या अनेक भूमिकांइतकीच माझ्या साड्यांनी आणि वेगवेगळ्या लुक्सनीही मला एक वेगळी ओळख मिळवून दिली आणि याच प्रेमातून, याच जिव्हाळ्यातून जन्म झाला ‘अमूल्य बाय अमृता’चा ! आज जगाच्या कानाकोपऱ्यात मी अभिमानाने नौवारी नेसते, पैठणी मिरवते. कारण माझ्यासाठी ही केवळ साडी नाही, तर आपल्या महाराष्ट्राची परंपरा, आपल्या स्त्रियांचा स्वाभिमान आणि आपल्या मातीशी जोडलेलं एक सुंदर नातं आहे.ही परंपरा जपणं, तिचं सौंदर्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं आणि आपल्या मराठमोळ्या साड्यांना जगभरात मानाचं स्थान मिळवून देणं, हेच माझं स्वप्न आहे कारण ‘अमूल्य’ हा फक्त माझा ब्रँड नाही, तर माझ्या आयुष्यातल्या एका अतिशय जिव्हाळ्याच्या आठवणीपासून सुरू झालेला प्रवास आहे”

अस्सल मराठी नऊवारी, हातमागावर विणलेल्या पैठण्या आणि पारंपरिक साड्यांचं सौंदर्य जपणं हीच अमृताच्या ‘अमूल्य बाय अमृता’ या ब्रँडची खासियत असून बॉलिवूड मध्ये आपली मराठमोळी पैठणी सध्या चर्चेत आहे. अभिनय आणि नृत्यातून महाराष्ट्राची संस्कृती जगभर पोहोचवणारी अमृता आता उद्योजिका म्हणूनही मराठी परंपरेचा वारसा अभिमानाने पुढे नेत असून मराठी मातीशी नाळ जपणारी अमृता खानविलकर आता बॉलिवूडच्या तारकांनाही मराठमोळ्या साजाची भुरळ पाडतेय !

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande