
नाशिक, 24 नोव्हेंबर (हिं.स.)। चांगल्या परताव्याची हमी देऊन जळगावच्या दोन भामट्यांनी एका व्यापाऱ्याकडून पाच लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याची घटना इंदिरानगर येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आरोपी सचिन चिंचोरे व राहुल पडळसे (दोघे रा. जामनेर, जि. जळगाव) यांनी फिर्यादी अजय रमेश पाटील (रा. अवधूत अपार्टमेंट, चेतनानगर) या व्यापाऱ्यास संगनमत करून चांगल्या परताव्याची हमी देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर दोन्ही आरोपींनी नागरेनगर येथील साईकृपा हॉटेलजवळ फिर्यादीला गाठून त्यांच्याजवळून पाच लाख रुपये घेतले; मात्र बरेच दिवस होऊनही मूळ रक्कम व परतावा परत मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. हा प्रकार दि. १५ जुलै २०२४ ते दि. २२ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत घडला. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकोलीकर करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI